बेकायदेशीर कृत्य केल्यास गुन्हा नोंदवणार: सचिन खामगळ
तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी / प्रतिनिधी
टेंभुर्णी पोलिस ठाणे हद्दीत कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांनी दिली.
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी हद्दीतील सातेफळ या गावात शासकीय जमिन गट क्रमांक 14 या ठिकाणी दि 28 रोजी विनापरवाना साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांचा अनधिकृत रित्या पुतळा उभारण्यात आला आहे. सदर प्रकरणामध्ये सातेफळ येथील तलाठी यांच्या तक्रारीवरून कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तपास पोलीस उपनिरीक्षक श्री देशमाने करत आहेत.
खामगळ म्हणाले की राष्ट्रपुरुषांचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुतळे उभे करण्यात येते ,मात्र या पुतळ्याचे देखभाल व दुरुस्ती अभावी विटंबना होऊन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासनाने पुतळ्याची उभारणी व त्यांचे पावित्र राखण्यासंदर्भात काही नियम केले आहे ,मात्र या नियमाचे उल्लंघन करून जबाबदारीने वागण्यात येत नसल्याने अनुसूचित प्रकाराला चालना मिळून सामाजिक वातावरण ठवळण्यास सुरवात होते. त्यामुळे टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांनी जबाबदारीने वागून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .