भोकरदनला किरकोळ कारणावरून दोन गटात मारामारी
दोन्ही गटातील ३५ जणांवर गुन्हा दाखल
भोकरदन : शहरातील अत्तार गली येथील मोठ्या जामा मशिदीत सोमवारी (दि.०८) रात्री क्षुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या वादातून मशिदीबाहेर दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही गटातील ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या संदर्भात फिर्यादी शेख नईम अब्दुल गफूर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी (दि.०८) रात्री सव्वा सातच्या सुमारास माझा मुलगा व भाऊ नमाज अदा करण्यासाठी जामा मशिदीत गेले होते. नईमुद्दीन शेख चाँद यांनी समितीकडे पैसे जमा केले, मग मशिदीत नवीन इन्व्हर्टर का आणले नाही, नवीन माऊस का बसवले नाही, अशी विचारणा केली असता, या कारणावरून नईमुद्दीन व शेख शफीक यांनी मला तुम्ही बाहेर या, अशी धमकी दिली.
त्यांनी बेकायदेशीरपणे मंडळी एकत्र केली. शफीक सलीम कुरेशी, रफिक यासीन कुरेशी, रशीद यासीन खान, मुजम्मिल शब्बीर कुरेशी, आसिफ शब्बीर कुरेशी, सादेक शब्बीर कुरेशी, फजल युसूफ खान, अरबाज अफजल खान, फरहान सत्तार कुरेशी, शाहबाज अफजल खान, नईमुद्दीन कुरेशी, सत्तर कुरेशी शेख, नईमुद्दीन शेख, सत्तर कुरेशी मुदस्सीर नसीर कुरेशी, बिस्मिल्ला युसूफ खान, अस्लम यासीन खान (सर्व रा.कुरेशी मोहल्ला) यांनी शेख नईम, त्याचे मुलगा व त्याचा भाऊ व पुतण्यास काठ्या व बेल्टने मारहाण केली तर त्यांचे मेहुणे प्रवीण शेख इक्बाल यांनी मध्यस्थी करून भांडण थांबवले.
तसेच त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शेख नईम यांच्या फिर्यादीवरून वरील सर्वांवर विरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर अक्रम खान शफीक कुरेशी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री 7:15 च्या सुमारास शेख नईम याने शेख गफूरला विचारले की, तू मशिदीत मोठ्याने का बोलत आहेस, याच कारणामुळे शेख नईम मशिदीच्या बाहेर जोरात बोलत होता.
अक्रम खान, शेख नईम अब्दुल गफूर, शेख नदीम शेख नईम, कामरान शेख नईम, मुजम्मिल शेख शफीक, शफीक अब्दुल गफूर, आदिल अब्दुल शफीक यांच्या फिर्यादीवरून आरोपी व साक्षीदार व इतर लोकांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. अस्लम अब्दुल रहमान, तोसिफ अब्दुल रहमान, रेहान अब्दुल रहमान, नुरजहा शेख नईम, इक्बाल अब्दुल गफूर, आसिफ अब्दुल रफिक, शारेक अब्दुल रफिक, रिझवान शेख रौफ, रहेमान अब्दुल गफूर, अयान शेख इक्बाल, अन्वर अब्दुल रफिक प्रवीण इक्बाल, शेख गब्बर बन्नू, अकरम अब्दुल रहमान (रा.अत्तर गल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मंडलिक हे करीत आहेत.