अक्कलकोट – येथील उत्तर पोलीस ठाण्यातील वाहतूक विभागाने एका महिन्यात नो पार्किंग च्या ठिकाणी लावलेल्या वाहनावर तब्बल ६ लाख ४० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे नागरिकामध्ये शिस्त लागण्यास हातभार लागत असून भाविकांच्या वाहनांमुळे होणारी मंदिर वाहतूक कोंडी कमी झाली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व पोलीस निरीक्षक पोलिस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पोलिस स्टेशनच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. एका महिन्यात तब्बल ८७० वाहनांवर नो पार्किंगचे ऑनलाईन दंड ठोठावण्यात आला. मंदिर परिसरात हत्ती तलाव जवळ दोन होम गार्ड नियुक्त करून आधी सूचना देऊन ही कारवाई करण्यात आली.
तसेच कलम १८५ अंतर्गत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या २५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच धोकादायक वाहन चालवणे, पार्किंगच्या ४० वाहन चालकावर कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय फिरोज इनामदार, हवालदार बाबुराव पाटील, विजय मणुरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय गौरकर, पोलीस कॉन्स्टेबल सूरज चौधरी आदीनी ही कारवाई केली.
८७० वाहनावर नो पार्किंगचे सहा लाख ४० हजार रुपयाचा ऑनलाईन दंड केला आहे.वाहन चालकाना शिस्त लावण्यासाठी कठोर कारवाई केली आहे. यापुढेही कारवाईमध्ये सातत्य असेल. भाविकांनी व नागरिकांनी कडक नियम पाळावे.
_ दीपक भिताडे, पोलीस निरीक्षक


















