Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तरुणांना आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व वाढवण्याची मोठी संधी – निर्मला सीतारामन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 25, 2024
in india
0
तरुणांना आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व वाढवण्याची मोठी संधी – निर्मला सीतारामन
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तरुणांना आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व वाढवण्याची मोठी संधी आहे. आंतरराष्ट्रीय लवाद मंडळांमध्ये काम करू शकणारे प्रशिक्षित व्यावसायिक भारताला मिळावे, अशी आशा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली. कायद्याचा वापर दहशतीचे साधन म्हणून न करता सक्षम करणारे साधन म्हणून करण्यावर सरकारचा विश्वास असल्याचेही त्या म्हणाल्या.

प्रत्यक्ष उपस्थिती आणि ऑनलाइन अशा हायब्रीड (मिश्र) माध्यमातून शिक्षण घेण्याची सुविधा असलेले पहिले संपूर्ण डिजिटल कॅम्पस (परिसर) सुरु होणे, ही विशेष गोष्ट असून, पाठशाला म्हणून नुकत्याच सुरू झालेल्या संस्थेचा विस्तार आज दुबईमधील एका कॅम्पससह पाचवे कॅम्पस सुरु करण्या इतका झाला आहे, ही गोष्ट अत्यंत उल्लेखनीय असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पाचव्या कॅम्पसचे उद्घाटन करताना सांगितले. बिट्स पिलानी या संस्थेने आजवर जगभरातील फॉर्च्युन 500 कंपन्यांना 7400 सीईओ दिल्याचे त्या म्हणाल्या. पिलानी, गोवा, हैदराबाद आणि दुबई नंतर हे संस्थेचे मुंबईतील कल्याण हा पाचवा कॅम्पस आहे.

भारतातील वाढत्या स्टार्टअप उद्योगांना बिट्स (BITS) सारख्या उद्यमशीलतेला चालना देणाऱ्या संस्थांमुळे मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. बिट्स च्या इन-हाउस प्रवर्तकांद्वारे शिष्यवृत्तीच्या स्वरुपात 125 कोटी रुपये देण्याच्या प्रथेचीही त्यांनी प्रशंसा केली. बिट्स हे भारतात अस्तित्वात असलेल्या धर्मादाय सहाय्य संस्कृतीचे उदाहरण आहे, असे अर्थमंत्री म्हणाल्या.

बिट्सने भारताला 6400 स्टार्टअप दिले असून, यापैकी 13 युनिकॉर्न (Unicorns) आणि 2 डेकाकॉर्न (decacorns) आहेत. अर्थमंत्री सीतारामन पुढे म्हणाल्या, “बिट्स कॅम्पसमध्ये 170 स्टार्ट-अप्सची सुरुवात झाली होती, यावरून बिट्स याबाबत प्रवर्तकाची भूमिका कसे बजावते, हे दिसून येते. बिट्स मधील 17,800 शैक्षणिक प्रकाशने बिट्स ची संशोधनाला प्रोत्साहन देण्याची संस्कृती दर्शवतात.” भारत सरकार सेमीकंडक्टर क्षेत्राला मोठी चालना देत आहे असे सांगून बिट्स पिलानीमध्ये स्वतंत्र सेमीकंडक्टर विभाग आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

नुकत्याच जाहीर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात संशोधन आणि नवोन्मेष विशेष उद्दिष्टासाठी केलेल्या 1 लाख कोटी रुपयांच्या तरतुदीचा अर्थमंत्र्यांनी उल्लेख केला आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

अर्थमंत्री सीतारामन यांनी बिट्स मधील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपक्रमाची प्रशंसा केली, जीएआयच्या सहाय्याने संदेशाचे व्हिडिओ रूपांतरण करण्यावर काम करत आहे. ही सुविधा किफायतशीर दरात बाजारात उपलब्ध होईल, अशी त्यांनी आशा केली.

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की भारत सरकार पाच तत्त्वांसह काम करत आहे आणि तो केस स्टडीसाठी एक विषय ठरू शकेल.

पाच तत्त्वे : ‘किमान सरकार, कमाल शासन’, संपूर्ण सरकार दृष्टीकोन, वापरकर्त्यांचा अभिप्राय आणि तक्रार निवारण, आउटपुट-आउटकम देखरेख चौकट आणि कायझेन.

कोविड महामारी, दोन युद्धे आणि सागरी चाचेगिरी यामुळे भारताच्या पुरवठा साखळीवर कसा परिणाम झाला आणि त्यावर मात कशी केली यावर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे असे आवाहन अर्थमंत्र्यांनी केले.

“कोविड लसींचे यश आणि कोविड लस प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा वापर हे देखील केस स्टडीसाठी चांगले विषय आहेत. सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीम (CPGRAMS), अर्थात केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यामध्ये उल्लेखनीय काम करत आहे आणि तक्रारी साचून राहणार नाहीत हे सुनिश्चित करत आहेत,” अर्थमंत्री म्हणाल्या.

केंद्र आणि राज्यांमधील सुधारित तांत्रिक समन्वयाविषयी त्यांनी यावेळी सांगितले, ज्याद्वारे कोणताही विलंब न होता करदात्यांच्या पैशाचा वापर केला जातो, आणि त्याच्या परिणामांवर नीती आयोगाद्वारे देखरेख ठेवली जाते.

“67 सरकारी विभाग 600 हून अधिक केंद्र सरकारच्या योजनांसाठी आउटपुट-आउटकम चौकटीचा वापर करत आहेत, अशी माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी माहिती दिली.

बिट्स संस्थेचे कुलपती कुमार मंगलम बिर्ला यावेळी म्हणाले की, “बिट्स पिलानीचा पाचवा कॅम्पस या प्रतिष्ठित संस्थेचा गौरवशाली प्रवास दर्शवत आहे. संस्थेच्या चार कॅम्पस मध्ये 18000 विद्यार्थी शिकत आहेत. या संस्थेने काही पिढ्यांमध्ये स्वप्ने पाहण्याची महत्वाकांक्षा, गांभीर्याने विचार करण्याची आणि अथक प्रयत्न करण्याची क्षमता निर्माण केली आहे. या संस्थेने भारताला आणि जगाला हजारो उद्योजक दिले आहेत.

Post Views: 41
Previous Post

कॉलेजमध्ये इतिहासाची आवड नव्हती – मनोज बाजपेयी

Next Post

झेंडा नव्हे अजेंडा हवा, उमेदवार जातीचा नव्हे आपल्या कामाचा हवा; बच्चू कडूंची सध्याच्या राजकारणावर टीका

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
झेंडा नव्हे अजेंडा हवा, उमेदवार जातीचा नव्हे आपल्या कामाचा हवा; बच्चू कडूंची सध्याच्या राजकारणावर टीका

झेंडा नव्हे अजेंडा हवा, उमेदवार जातीचा नव्हे आपल्या कामाचा हवा; बच्चू कडूंची सध्याच्या राजकारणावर टीका

ताज्या बातम्या

दोन गटाच्या मारहाणी मध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.#viral #marathinews #public

February 15, 2026

तांदुळवाडी मध्ये महिला मेळावा संपन्न.#public #solapurnews #viral #trending

February 15, 2026

बदनापूर मध्ये गुटख्याच्या साठ्यासह अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल व वाहन जप्त.#public #marathinews

February 15, 2026

अमृतेश्वर गोमुख संस्थान मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन.#viral #solapurnews #public

February 15, 2026

भोकरदन तालुक्यात मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड.#viral #public #tranding

February 15, 2026

डॉ. सुधा फडके यांचे निधन..#viral #public

February 15, 2026

टिपू चे कौतुक केल्याबद्दल सपकाळांवर गुन्हा दाखल.#viral #पब्लिक #public

February 15, 2026

माहूर मध्ये मासरेड अंतर्गत अवैधरित्या हातभट्टी दारूचे दोन अड्डे उद्ध्वस्त..#viral #पब्लिक

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0682297

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697