ईस्लापुर. बातमीदार..
दिनांक ११ रोजी इस्लापूर येथील नांदेड -किनवट या राज्य महामार्गावर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रा. संस्थापक चंद्रकांत भंडारे, यांनी आमरण उपोषणास बसले आहेत त्यांची तब्येत दिवसोन दिवस खालावत आहे. शासनाने अद्याप पर्यंत त्यांची दखल न घेतल्या कारणामुळे हे सदरील रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याची माहीती अंदोलनकर्तानी दिली व जाती आरक्षण अ. ब .क .ड. आरक्षणाची वर्गीकरण करावे.
महाराष्ट्रातील सर्व समाजातील बांधवांचे प्रश्न मार्गी लावावे आदि मागणीसाठी उपोषण चालू आसल्याचे म्हणणे आहे. या उपोषणाला शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे इस्लापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे रास्ता रोको आंदोलन सतत तीस मिनिटे चालू होते. काहीकाळ वाहनधारकांना थांबावे लागेल लागले नंतर आंदोलनकर्त्यांनी येथील सहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, यांना निवेदन देत आंदोलन माघार घेण्यात आले .
नंतर किनवट नांदेड महामार्ग जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आला.