अर्धापूर नगर पंचायत प्रशासनाला दिले निवेदन
अर्धापूर दि. (ता.प्र.) दिनांक 5 आॅगस्ट 2024 पासून हिंदू धर्मीयांचा पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे.अर्धापूर शहरातील नगर पंचायत हद्दीतील सर्व महादेव मंदिर परिसरात साफसफाई व लाईट बसविणे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.या मागणीचे निवेदन बुधवारी (ता.31) अर्धापूर नगर पंचायतीच्या कार्यालयीन अधिक्षक अंकिता टिकार यांना देण्यात आले.
श्रावण महिन्यात दररोज पहाटे पासून ते रात्री पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. शहरात बरेच महादेव मंदिर आहेत.त्या महादेव मंदिर परिसरात साफसफाई व लाईट बसविणे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे या मागणीचे निवेदन नगर पंचायत प्रशासनाला अर्धापूर शहरातील शिवभक्तांनी दिले आहे.
या निवेदनावर लक्ष्मीकांत मुळे गुरू, अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत विरकर,विष्णू टायकुटे, गजानन मेटकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.