भोकरदन : दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले माननीय मनीषजी शिसोदिया यांना 17 महिन्यानंतर जमानात मिळाली असून त्यांची जेलमधून सुटका झालेली आहे. भारतीय संविधानामुळे हा विजय झालेला आहे. हुकूमशाही प्रवृत्तीला ही एक जोरदार चपराक आहे. असे बोरसे गुरुजी प्रसार माध्यमाची बोलताना म्हणाले.
याबाबत सविस्तर असे की, दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळातील माजी शिक्षण मंत्री असणारे माननीय मनिष सिसोदिया यांनी दिल्लीमध्ये सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करून शैक्षणिक क्रांती घडून आणलेली आहे. सरकारी शाळा दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. क्लास वन अधिकाऱ्याची मुले, व्यापाऱ्याच्या, उद्योगपतीच्या मुलांनी खाजगी शाळा सोडून दिल्लीच्या सरकारी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे.
खरे म्हणजे अतिशय कार्यक्षम अशा या शिक्षण मंत्र्याला तथाकथित दारू घोटाळ्यामध्ये आरोपी करण्यात आले त्यामुळे ते गेल्या 17 महिन्यापासून जेलमध्ये होते त्यांना ट्रायल कोर्टाने जमानत नाकारली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र त्यांना जमानत दिली असून त्यांची जेलमधून सुटका झालेली आहे. आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ एकत्र येवुन कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव!पेढे वाटून हा आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीचे ॅतालुकाअध्यक्ष, जनार्दन पाटील सोळंके,शहर अध्यक्ष महजादखान, युवा अध्यक्ष करीम लाला, काकासाहेब साबळे, महेश पुरोहित, फारुख भाई, फिरोज भाई बाबर भाई, यांच्यासह आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक हजर होते,

















