मंठा/ प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील तळणी सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी सभापती संतोष वरकड, शिवसेना उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर माऊली सरकटे, शहरप्रमुख वैजनाथ बोराडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप बोराडे, विभागप्रमुख बबन शेळके, बालासाहेब बोराडे, गटनेते अचीत बोराडे, जे के कुरेशी, उबेद बागवान, शिवाजी येऊल, पप्पू दायमा यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी तळणी सर्कलमधील आवेश पठाण, सुखदेव हनवते, भगवान सरकटे, जुनेद शेख, महादेव सरकटे, राजेश सरकटे, समाधान सरकटे, पंढरी हनवते, गजानन पितळे, संदीप सरकटे, भागवत सरकटे, दीपक कंबळकर, सरताज शेख, अशोक सरकटे, नवनाथ सरकटे, प्रदीप दुगाने, साबीर शेख, अनिल राऊत, सतीश दह्याळकर, अमोल खोटे, अमोल सरकटे, अनिकेत देशमुख, शुभम कबळकर, ऋषिकेश देशमुख, आकाश गुडघे, सिद्धार्थ मुर्तडकर, अभिषेक सोनुने, कृष्णा राऊत, अमर सरकटे, राहुल भारस्कर, धनंजय सरकटे, राहुल पावडे, शुभम शिंदे यांच्यासह तळणी परिसरातील अनेक युवक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व युवकांचा शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.