सोलापूर – नवी पेठेतील शिवसंदेश शिवजन्मोत्सव तरुण मंडळाची बैठक राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसंदेश ग्रुपचे संस्थापक अॅड. योगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोठा उत्साहात पार पडली. या बैठकीत सर्वानुमते नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
सन 2005 पासून नवी पेठ सारख्या मुख्य बाजारपेठेत व्यापारी व शिवसंदेश ग्रुपच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. यावर्षी शिवजन्मोत्सवाचे 22 वे वर्ष आहे. शिवसंदेश मंडळाने सामाजिक भान ठेवून गेल्या चार वर्षापासून डॉल्बी मिरवणूक काढणे बंद करून देखावे करण्यास सुरुवात केली. यावर्षी शिवजन्मोत्सव काळात गोल्डन टेंम्पल (आयप्पा स्वामी) देखावा साकारण्यात येणार आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीही विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे ठरले.
या बैठकीचे सूत्रसंचालन सचिन गुळग यांनी तर आभार प्रदर्शन आदित्य राजपूत यांनी केले. यावेळी अॅड. सचिन गायकवाड, रवि गोयल, मनोहर गोयल, विश्वजित चूंगे, राहुल गोयल, विनोद पवार, अजिनाथ परांडकर, प्रमोद लोखंडे, विशाल पवार, संभाजी जाधव, नवाज शेख, क्रांती गोयल, अप्पू गुजले, इम्रान शेख, हरी कोळेकर, देवीसिंग राजपूत, धनंजय जाधव, बाळू लोंढे, दत्ता जाधव, रसूल पठाण, आनंद नरळे, सागर काटकर, तानाजी नरळे, ओंकार लोखंडे, आदित्य राजपूत, आकाश देवकुळे, संजय फुलारी, संतोष गुंड, राजू माने, सादिक पिरजादे, उमेश पवार, संदेश लोखंडे, अभिषेक राजपूत यांसह असंख्य कार्यकर्त्ते व शिवभक्त उपस्थित होते.
या नुतन पदाधिकाऱ्यांची निवड
कार्याध्यक्ष विजय माने, उपाध्यक्ष गणेश घोडके, सचिव किरण गुळग, खजिनदार ओंकार लोखंडे, प्रसिद्धीप्रमुख शैलेन्द्र पाटील, पुजा प्रमुख आरीफ शेख, सचिन गोयल



























