भोकरदन येथील एसटी वाहतूक नियंत्रकाचा मनमानी कारभार; प्रवाशांचा संताप
भोकरदन : एसटी बस आगारातून सोडण्यात येणाऱ्या एसटीबस अधिकाधिक नादुरुस्त असतात तर त्या कधीच वेळेवर सोडल्या जात नाहीत. याबाबत चौकशी केली तर वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांकडून उद्दट उत्तरे दिली जातात. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासीवर्ग त्रस्त आहेत. दरम्यान भोकरदन येथील बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक पी.डी.राजपुत हे शालेय विद्यार्थ्यांसह महिला प्रवाशांना उद्धट भाषेत बोलतात. त्यांच्याबाबत आगारप्रमुखाकडे अनेक तक्रारी असताना त्यांची याकडे दुर्लक्ष आहे.
भोकरदन तालुका हा तसा दुर्लक्षित म्हणूनच परिचित असल्याने या तालुक्यातील एसटी डेपोतून सोडण्यात येणाऱ्या जवळच्या व लांबपल्याच्या बस फेऱ्या ह्या वेळेत सोडल्या जात नाही तर ज्या सोडल्या जातात त्या अर्ध्यावर बिघडल्यामुळे बंद पडतात या वेळी बसमध्ये टॉमी, टूल बॉक्स, ज्यॅक, प्राथमिक साहित्य देखील बस मध्ये साधे हे देखील उपलब्ध नसते या साठी वाहक, चालक यांना दुसरी बस येण्याची वाट पहावी लागते. यामुळे प्रवासी व शालेय विदयार्थ्यांना जि.प शाळा, महाविद्यालय मध्ये जाण्यासाठी उशीर होतो तर काही वेळा जि. प शाळा, कॉलेज बुडवावे लागते तर प्रवाशांना वेळेत घरी पोचता येत नाही.
या बाबत आगार प्रमुख यांच्याकडे अनेकवेळा लेखी व तोंडी तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी याबाबत होणाऱ्या त्रासाबद्दल विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या कडे लेखी तक्रार करून देखील जाफराबाद एसटी आगारात कोणतीच सुधारणा होत नसल्याने भोकरदन तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या जाफराबाद एसटी आगारातील भोकरदन येथील एसटी महामंडळाची वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे ह्या डेपोला भारमान मिळत नाही. प्रवाशाना नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा अवलंब स्विकारावा लागत असल्याने खाजगी वाहतुक व एसटी अधिकारी यांचे काही आर्थिक साटेलोटे तर नाही ना ? अशी शंका प्रवासी वर्गात निर्माण होत आहे. या सर्व होणाऱ्या जाफराबाद डेपोच्या अंतर्गत येणाऱ्या भोकरदन येथील बस स्थानकात गलथान कारभारामुळे प्रवासी त्रस्त झाला आहे. याकडे जातीने लक्ष घालून प्रादेशिक महाव्यवस्थापक मुंबई, विभागीय नियंत्रक छत्रपती संभाजीनगर आळा बसावा एवढीच प्रवासी वर्गाला आशा उरली आहेत.