Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

झारखंडनंतर बिहारचे काँग्रेस आमदार हैदराबादमध्ये, दुसरीकडे जीतनराम मांझींनी वाढवलं नितीशकुमारांचं टेन्शन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 6, 2024
in india, political
0
झारखंडनंतर बिहारचे काँग्रेस आमदार हैदराबादमध्ये, दुसरीकडे जीतनराम मांझींनी वाढवलं नितीशकुमारांचं टेन्शन
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव १२ फेब्रुवारी रोजी विधानसभेत मांडण्यात येणार आहे. एनडीएकडे बहुमत असलं तरी माझींनी जदयू भाजपचं टेन्शन वाढवलं आहे.

 

 

बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या संयुक्त जनता दल (जदयू) आणि भाजप युतीच्या सरकार विश्वासदर्शक ठरावाला येत्या सोमवारी (दि. १२) सामोरे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या आमदारांचा मुक्काम तेलंगणामधील हैदराबाद शहराजवळ हलविला आहे. हैदराबादपासून सुमारे तीस किलोमीटरवर असलेल्या इब्राहिमपटनम येथे एका रेसॉर्टमध्ये काँग्रेस आमदार थांबले आहेत. ते रविवारपर्यंत (दि. ११) तेथे मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. बिहारमधून रविवारी (दि. ४) सायंकाळी वीस जण हैदराबादमध्ये दाखल झाले. यात काँग्रेसचे १७ आमदारांचा समावेश होता.

 

 

इंडिया आघाडीचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या बिहारमधील ‘जदयू’ने गेल्याच आठवड्यात लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत असलेली आघाडी तोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपने पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर ‘जदयू’ अध्यक्ष नितीशकुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता नितीशकुमार यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे.

 

 

बिहारलगतच्या झारखंडमध्ये मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तत्पूर्वी, सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) पक्षाच्या आमदारांनी देखील तेलंगणमध्येच तीन दिवस मुक्काम ठोकला होता.

 

 

‘…ही तर अपवित्र युती’

‘जदयू’ अध्यक्ष नितीशकुमार यांनी भाजपच्या दबावाला बळी पडत अपवित्र युतीचे सरकार स्थापन केले, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) नेते मेहबूब आलम यांनी केली. नितीशकुमारांना भाजपने हायजॅक केले आहे. ते भाजपप्रणित ‘एनडीए’ आघाडीमध्ये का गेले, याच्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. जनता ते कदापी विसरणार नाही, असेही मत आलम यांनी मांडले.

 

 

जीतनराम मांझी यांनी नितीशकुमारांचं टेन्शन वाढवलं

जीतनराम मांझी यांनी त्यांच्या पक्षाला किमान २ मंत्रिपदं मिळावीत, अशी भूमिका मांडली आहे. जीतनराम मांझी यांनी आम्हाला सार्वजनिक बांधकाम खात्यांसारखी मंत्रिपदं का मिळत नाहीत, असा सवाल केला होता. जीतनराम मांझी यांचा मुलगा संतोष सुमन यांना एससी एसटी कल्याण विभाग देण्यात आला आहे. राजदनं मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊनही नितीशकुमार यांच्या सरकारला पाठिंबा दिल्याचं मांझी यांनी म्हटलं.

Post Views: 54
Previous Post

केजरीवालांच्या निकटवर्तींयांवर ईडीची छापेमारी

Next Post

२०१९ ला एक एक करत लोकं गेले, आता घाऊक पद्धतीनं पक्षांतर, सारंग पाटील यांनी राष्ट्रवादीचा मेळावा गाजवला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
२०१९ ला एक एक करत लोकं गेले, आता घाऊक पद्धतीनं पक्षांतर, सारंग पाटील यांनी राष्ट्रवादीचा मेळावा गाजवला

२०१९ ला एक एक करत लोकं गेले, आता घाऊक पद्धतीनं पक्षांतर, सारंग पाटील यांनी राष्ट्रवादीचा मेळावा गाजवला

ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच काम कौतुकास्पद : महापौर विनायक कोंडयाल

February 14, 2026

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात, महाराष्ट्राचा शाहिरी बाणा : फोक आख्यानातून लोकसंगीताचा जल्लोष

February 14, 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या सांगोल्यात गावभेटी

February 14, 2026

सोजर इंग्लिश स्कूल आयोजित आनंद बाजारात ४० हजारांची उलाढाल

February 14, 2026

रोजगार मेळाव्यात 44 उमेदवारांची निवड

February 14, 2026

महारेशीमचा शुभारंभ; 5 हजार एकरवर तुती लागवडीचे लक्ष्य

February 14, 2026

वंदे भारत एक्सप्रेस मध्ये साप ठेवणाऱ्याला अटक

February 14, 2026

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षकपदी बढती

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679173

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697