ध्रप्रदेशच्या नेल्लोर येथे ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्या टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 20 जण जखी झाले आहेत. नेल्लोर जिल्ह्यातील मुसुनुरू टोल प्लाझा येथे आज, शनिवारी पहाटे हा अपघात घडला. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
यासंदर्भात स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या खाजगी बसने ट्रॅव्हल्स बसला धडक दिली. शनिवारी पहाटे झालेला हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच या घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. अपघातातील अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृताची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.