येवता:प्रतिनिधी:आप्पाराव सारुक.दि.१७रोजी केज तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्र चालू आहेत,या अंगणवाड्यांना शासना मार्फत बालकांना व गरोदर माता आणि किशोरवयीन मुलींना प्रति महीना पोषण आहार पुरवठा शासनामार्फत केला जातो. पुरवठा करणारे ठेकेदार हे नेहमी अनेक वेळा सांगून ही नेमके सुट्टीच्या दिवशी कॅन्टर टेम्पो वहानाने धान्य-माल पुरवठा सुट्टीच्या दिवशी किंवा दुपारनंतर अंगणवाडी केंद्र सुटल्यानंतर करतात.
हा विषय अनेक वेळा अंगणवाडी कार्यकर्त्या,मदतनीस यांनी वरिष्ठ कार्यालयास तोंडी कळविले आहे,परंतु संबंधित गुत्तेदारास यांचा फरक पडला नाही,आज दि.१७/०७/२०२४-बुधवार रोजी आषाढी एकादशी व मोहरम ची शासनमान्य सुट्टी असतानाही पोषण आहार मालाचे वाटप केलेने केज तालुक्यातील सेविका,कार्यकर्त्या, मदतनीस यांना फोन केल्याने सुट्टी असतानाही त्यांची धावपळ होऊन तारांबळ झाल्याचे दिसून आले.
आमच्या प्रतिनिधींने भ्रम्हध्वनी वरून चौकशी केली असता, सबंधित ठेकेदारास उद्याच लेखी नोटीस काढतो यापुढे ते तेसुट्टीच्या दिवशी व अंगणवाडी केंद्रांना अंगणवाडी कार्यालयीन वेळेतच माला पुरवठा केला जाईल. चंद्रशेखर केकान,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,बीड.
आमच्या प्रतिनिधीने केज कार्यालयाशी भ्रम्हध्वनी वरून संपर्क केली असता.संबंधितास तात्काळ सूचना दिल्या जातील. श्रीमती शोभा लटपटे,बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,केज. चौकट
आमच्या प्रतिनिधीने येवता सुपरवायझर यांना भ्रम्हध्वनी वरून चौकशी केली असता मी हा विषय वरीष्ठ कार्यालयास अनेक वेळेस तोंडी सांगतला आहे मात्र त्याचे पालन मालपुरवठा ठेकेदार करत नाहीत.
सुपरवायझर,
आशा डवरी
येवता बिट.
आमच्या प्रतिनिधी ड्रायव्हरशी भ्रम्हध्वनी वरुन विचारले असता कालच गाडी भरली असल्याने मी आज सुट्टीच्या दिवशी माल पुरवठा केला आहे.
टेम्पों ड्रायव्हर,
समाधान गोलर