पो.उ.नि सौ वैशाली कांबळे यांना विशेष सेवा पदक जाहीर,१५ऑगस्ट रोजी प्रदान
सोनखेड-(तभा वृत्तसेवा)
पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांना गृह विभागाच्या वतीने विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
त्यांनी गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात ७ जानेवारी २०२० ते २५ ऑगस्ट २०२३ या कार्यकाळात आष्टी पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येणाऱ्या अतिशय नक्षलग्रस्त व आदिवासी भागात एक महिला अधिकारी असून सुद्धा आपले कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे
पोलीस उपनिरीक्षक सौ. वैशाली निवृत्ती कांबळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गृह विभागाच्या वतीने विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे व ते पदक त्यांना १५ ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक व अविनाश कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला