सोलापूर – रेल्वे स्टेशन येथे अनधिकृत रिक्षावाले येतात, त्यांच्याकडे लायसन, बॅच बिल्ला नसतो. अरे रावीची भाषा करतात, भांडण करतात, मारण्याची धमकी देतात. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतात. कित्येक दिवसांपूर्वी लोह मार्ग पोलिसांनी वाहतूक नियमनासाठी दोन पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती आणि यापुढे देखील आम्ही लोहमार्ग पोलिसांकडे ही मागणी करणार आहे. सोमवारी सकाळी काही तासांपुरता रिक्षा संघटनेच्या वतीने संप पुकारला होता व त्यानंतर वाहतूक सेवा हे सुरळीत केले असल्याची माहिती रिक्षा स्टॉप संघटनेचे उपाध्यक्ष मधुसूदन गायकवाड यांनी दिली.
१४० रिक्षा संघटनेत रजिस्ट्रेशन आहेत. या संघटनेच्या रिक्षामध्ये काही राहिल्यास ते मिळण्यास वेळ लागत नाही व ते दिलेही जाते परंतु इतर बाहेरून आलेले रिक्षा याची जबाबदारी तेही घेत नाहीत आणि आम्हीही घेत नसतो.
यावेळी अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, उत्तम गवळी, रवी गुंड, वसंत माने, रमेश चौगुले, चंद्रकांत गुंड, पंकज गायकवाड आदी उपस्थित होते.




















