Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भारतीय अंतराळ युगाचे पितामह, शिल्पकारशिल्पकार विक्रम साराभाई!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 12, 2025
in india, international, maharashtra, science technology, social, top news, world
0
भारतीय अंतराळ युगाचे पितामह, शिल्पकारशिल्पकार विक्रम साराभाई!
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज : भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि आधुनिक भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून  ओळखले जाणारे महान संशोधक विक्रम साराभाई यांची १२ ऑगस्ट रोजी जयंती. अंतराळात भरारी मारणारा भारत असे आपण म्हणतो. एकवेळ सुई ही बनवू  न शकणारा आपला भारत आज विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण बनला आहे. अंतराळ विज्ञान क्षेत्रात  तर भारताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारत जागतिक महासत्ता बनत आहे याचे सर्व श्रेय विक्रम साराभाई यांनाच जाते. विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध उद्योगपती होते त्यामुळे देशातील मोठ्या नेत्यांचे त्यांच्या घरी उठबस असायची. त्यांच्या वडीलांनाही विक्रम साराभाई यांनी राजकारणात यावे किंवा उद्योगपती बनावे असे वाटत होते पण नियतीच्या मनात वेगळेच होते. विक्रम साराभाई यांना गणित आणि विज्ञान विषयाची खूप आवड होती.
उच्च शिक्षण घेण्यासाठी ते विदेशात गेले. केंब्रिज विद्यापीठात त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. अतिशय तल्लख बुद्धीच्या विक्रम साराभाई यांनी अल्पावधीतच विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केली. भारतात आल्यावर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर सी व्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्मिक किरणांवर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिक आज मल्लिका हे दोन अपत्य झाली.
१९४५ साली ते ब्रिटनला गेले तिथे त्यांनी इन्वेस्टीगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्युडवर संशोधन करून पीएचडी मिळवली. ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबादला त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबरोटरीची स्थापना केली. केरळ जवळील थुंबा हे ठिकाण लॉंच पॅड साठी निश्चित करण्यात आले कारण हे ठिकाण मॅग्नेटिक इक्वेटर लाईन ( चुंबकीय भूमध्य रेखा ) च्या अगदी जवळ होते पण त्याठिकाणी काही घरे होती तसेच एक चर्चही होते त्यामुळे तेथील लोक तेथून हटण्यास तयार नव्हते भौगोलिक आणि वैज्ञानिक कारणामुळे ही जागा खूप महत्वाची होती पण तेथील लोक ती जागा देण्यास तयार नव्हते शेवटी विक्रम साराभाई यांनी त्या लोकांची भेट घेतली त्या जागेचे महत्व त्यांना समजावून सांगितले.
विक्रम साराभाई यांच्यामुळे ती जागा सरकारला देण्यास लोक तयार झाले. भारत सरकारने त्याठिकाणी थुंबा रॉकेट लॉंचिंग स्टेशनची स्थापना केली. २१ नोव्हेंबर १९६५ ला तिथून पहिल्या रॉकेटचे प्रेक्षपण करण्यात आले ते यशस्वी झाले. विक्रम साराभाई यांच्यामुळे हे शक्य झाले म्हणून भारत सरकारने या स्टेशनचे विक्रम साराभाई  स्पेस सेंटर असे नामांतर केले. विक्रम साराभाई स्पेस सेंटर तर उभारले गेले पण तिथे तज्ज्ञ संशोधकांचा तुटवडा भासू लागला.
देशातील तरुण संशोधक विदेशात सेवा बजावत होते. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतात परतण्याचे आवाहण केले.  त्यांनी या संशोधकांना सांगितले की देशाचे बजेट कमी असल्याने आम्ही तुम्हाला परदेशात आहेत त्याप्रमाणे वातानुकूलित प्रयोगशाळा आणि ऑफिस देऊ शकणार नाही, पण टेबल खुर्ची आणि एक कपाट नक्की देऊ. भारत मातेच्या सेवेसाठी तुम्ही देशात परत या. त्यांच्या आवाहनाला अनेक संशोधकांनी प्रतिसाद दिला. वसंत गोवरीकरांसारखे महान शास्त्रज्ञ त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देऊन भारतात परतले.  त्यांनी तज्ज्ञ सांशीधकांची एक टीम बनवली त्यांच्या नेतृत्वाखालील या टीमने विमानाचे, अंतरिक्ष यानाचे ( रॉकेट ) उड्डाण यशस्वी व्हावे यासाठी जीवाचे रान केले. दिवस रात्र मेहनत केली. त्यांच्या या अविश्रांत मेहनतीचे फळ म्हणजे ‘आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह अंतराळात झेपावला. अंतराळ क्षेत्रात भारताने पहिले यशस्वी पाऊल टाकले.
डॉ विक्रम साराभाई यांच्या अथक प्रयत्नांमुळेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेची ( इसरो) ची स्थापना झाली. आयआयएम अहमदाबाद च्या स्थापनेतही त्यांचे मोलाचे योगदान आहे. १९६६ साली  डॉ होमी जहांगीर भाभा यांच्या निधनानंतर ते परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनले. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली. अवकाश संशोधनासोबतच टेक्सटाईल, फार्मासिटीकल, अणुऊर्जा, कला या क्षेत्रातही त्यांनी विशेष कामगिरी केली. आज भारत अंतराळ विज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण आहे यामागे विक्रम साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ अब्दुल कलाम यांनीही आपल्या अग्निपंख या आत्मचरित्रात विक्रम साराभाई यांच्या नेतृत्व गुणाचे कौतूक केले आहे.
डॉ अब्दुल कलाम विक्रम साराभाई यांच्या विषयी म्हणतात, ‘ते स्वप्न पहायचे आणि ते प्रयक्षात उतरवण्यासाठी मेहनतही घ्यायचे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य त्यांच्या सहकाऱ्यांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत ठरले आहे. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना वेगळी दृष्टी दिली. विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार आहेत.’ त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या मानाच्या पुरस्काराने गौरविले आहे. विज्ञानाचा उपयोग मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी झटणाऱ्या या महान संशोधकाचे ३०डिसेंबर १९७१ साली थुंबा येथेच हृदयविकाराने निधन झाले. विक्रम साराभाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Post Views: 26
Previous Post

महायुती सरकारमधील भ्रष्ट व कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करावी : उद्धव ठाकरे 

Next Post

टाटा पवनचक्की कंपनीचे वनविभागाच्या राखीव जंगलावर अतिक्रमण; रस्ता व झाडांची बेकायदेशीर कत्तल, कारवाईच्या प्रतीक्षेत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
टाटा पवनचक्की कंपनीचे वनविभागाच्या राखीव जंगलावर अतिक्रमण; रस्ता व झाडांची बेकायदेशीर कत्तल, कारवाईच्या प्रतीक्षेत

टाटा पवनचक्की कंपनीचे वनविभागाच्या राखीव जंगलावर अतिक्रमण; रस्ता व झाडांची बेकायदेशीर कत्तल, कारवाईच्या प्रतीक्षेत

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677472

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697