ईस्लापूर प्रतिनिधी
दि.8/07/2024
ईस्लापूर मधील स्मशानभूमी परिसरा मध्ये अतिशय दुरावस्था व दुर्गंध पसरली होती. ते पाहून येथील बालाजी पळसपुरे यांनी स्वतः पुढाकार घेत येथील स्मशानभूमी साफसफाई करण्याचा निर्णय केला. बालाजी पळसपुरे यांनी स्वखर्चाने जेसीबी लावून येथील झुडपे, बेसरम,पालव्या साफ केल्या
त्यांनी स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेवर दोन्ही बाजूने झाडे लावण्याचा संकल्प केला. यावेळी ईस्लापूर येथील प्रसिद्ध घमादेवी (सतीदेवी) आणि शनिदेव मंदिरापर्यंत रस्ता करावा अशी मागणी गावकरी करीत आहेत. यावेळी बालाजी पेशवे, भारत भोयर, कैलास गावंडे, शेख लतीप, सुदर्शन पाटील, सुरज लाशिनकर, संजय गुळेकर, गणेश जयस्वाल उपस्थित होत