भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान.
रामभाऊ जोशी हायस्कूल करकंबला ३ लाखांचे बक्षीस.
करकंब प्रतिनिधी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात रामभाऊ जोशी हायस्कूल करकंबने पंढरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने या हायस्कूलला ३लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.सदर कार्यक्रमांतर्गत प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकासाठी कागदपत्रांची संपूर्ण तपासणी व मूल्यांकनाकरिता दि२१.२.२०२४ रोजी डॉ.क्रांती कुलकर्णी अधिव्याख्याता डायट सोलापूर,गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे,आसनपुरे विस्तार अधिकारी नगरपालिका मंगळवेढा,जनबंधू मॅडम नगरपालिका शिक्षण मंडळ, मंगळवेढा,करकंब केंद्रप्रमुख ल.पा.कांबळे यांच्या उपस्थितीत शाळा,शाळेचे मैदान,कंपाउंडवरील भिंत्तीचित्रे,कंपाउंड लगत असणारी देशी झाडे,परसबाग,ग्रंथालय व प्रयोगशाळा,गांडूळ खत (कंपोस्ट खत),वर्गातील स्वच्छता,विद्यार्थ्यांची उपस्थिती, प्लास्टिकमुक्त शाळा या सर्वांची काटेकोरपणे २तास तपासणी करण्यात आली.
चौकट.
परीक्षकांनी शाळेची भौतिक सुविधा,विद्यार्थी गुणवत्ता,इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा,हिंदी परीक्षा, एनएमएमएस परीक्षा,शालाबाह्य स्पर्धा परीक्षा,क्रीडाविषयक बाबी,चित्रकला विषय व स्काऊट गाईडबद्दल विशेष समाधान व्यक्त केले,पंढरपूर तालुक्यातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित,स्वयंअर्थसहाय्य, सीबीएसई बोर्ड अश्या ११० शाळांमधून रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब प्रथम क्रमांकास पात्र ठरले.
या सवच्छता अभियानात मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विशेष करून सर्व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.या सर्वांचे डीएव्ही कॉलेज मॅनेजमेंट कमिटी नवी दिल्लीचे अध्यक्ष पद्मश्री पूनम सूरी,दयानंद शिक्षण संस्था सोलापूरचे स्थानिय सचिव महेश चौप्रा,प्रशासकीय अधिकारी डॉ. विजयकुमार उबाळे,शालेय शैक्षणिक सल्लागार समितीचे सदस्य व सर्व करकंब ग्रामस्थांनी अभिनंदन केले.