भोकरदन : भोकरदन येथील मुख्य रस्त्यावर बेशिस्त लावलेल्या व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर लावलेल्या ३४ दुचाकी सोमवारी एका वाहनातून उचलून भोकरदन पोलिस ठाण्यात नेण्यात आल्या. ही कारवाई स्वतः पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी केली असून संबंधित वाहनचालकांना तब्बल १६ हजार रूपयांचा दंडही ठोठावला आहे . शिवाय अनेक वाहन चालक रस्त्यावरच दुचाकी लावून कामानिमित्त जातात. परंतु, त्या दुचाकींमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अशा दुचाकींसह इतर वाहनांविरुद्ध पोलीस निरीक्षक
, किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कारवाई करत आहेत. दरम्यान पोलिसांनी सोमवारी रस्त्यावर लावलेल्या ३४ दुचाकी उचलून पोलिस ठाण्यात नेल्या. त्यापैकी २६ दुचाकी चालकांना १६ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. इतर ८ दुचाकींची कागदपत्रे सादर न केल्याने त्या ठाण्यातच लावण्यात आल्या. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बिडवे, पोउपनि कुकलारे, पवन राजपूत, सपोफौ भास्कर जाधव, गणेश पिंपळकर, सुदर्शन मोहिते, पोलिस नाईक विकास जाधव, अरुण वाघ, शरद शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप भुतेकर, गोपाल सत्वन ,नंदकुमार दांडगे, दीपक इंगळे, लक्ष्मण राणगोते, अनिल गवळी, आदींनी केली.