मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी भोकरला बालाजी कदम यांचे आमरण उपोषण
भोकर(प्रतिनिधी)मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराठी येथे चौथ्यांदा आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील बटाळा येथील बालाजी कदम यांनी २२जुलैपासून भोकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
मराठा योध्दा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी राज्यसरकारकडे अनेक वर्षापासून करित आहेत मागणी पूर्ण न झाल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पून्हा एकदा आंदोलनाची हाक दिली व मागील कांही दिवसापासून ते अंतरवली सराटी येथे अमरण उपोषण सूरु केले मनोज जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी बटाळा येथील बालाजी कदम यांनी भोकर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सूरु केले आहे.
यापूर्वी देखील बालाजी कदम यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केले होते उपोषणस्थळी शिवाजी पा. किन्हाळकर, प्रकाश देशमूख,आनंद चिट्टे, माधव पा.वडगावकर,शिवा जाधव,माऊली पा.चिंचाळकर यांच्यासह अनेक मराठा समाज बांधव भेट देऊन पाठींबा दर्शविला आहे.