बिग बॉस 17 या रिअॅलिटी शोची सर्वांना उत्सुकता आहे. या रिअॅलिटी शोची वाटचाल आता ग्रँड फिनालेकडे होत आहे. अशातच बिग बॉस 17 ला आता टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. नुकतंच शोमधून अंकीता लोखंडेचा पती विकी घराबाहेर गेला. त्यामुळे आता बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेची उत्सुकता शिगेला आहे.
हे ठरले बिग बॉस 17 चे टॉप 5 :
या शोमध्ये अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, मुनावर फारुकी, अरुण मशेट्टे आणि अंकिता लोखंडे हे टॉप 5 स्पर्धक फिनालेमध्ये दाखल झाले आहेत.
कलर्स चॅनलवर रविवारी 28 जानेवारी रोजी BB 17 ग्रँड फिनाले प्रसारित होणार आहे. हा ग्रँड फिनाले संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 12 च्या दरम्यान विजेत्याचे नाव घोषित केले जाईल. याशिवाय प्रेक्षकांना हा फिनाले JioCinema वर पाहता येईल.