बिलोली आण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी.
————————————————————-
बिलोली (तालुका प्रतिनिधी)
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त तालुक्यात व बिलोली शहरात प्रशासकीय कार्यालयासह विविध ठीकाणी मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले आहे. दि.१ आॕगस्ट रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती बिलोली शहरात अण्णाभाऊ साठे नगर,देशमूख नगर,नगर परीषद वाचनालय,ॲटो युनियन व विविध ठीकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
तद्नंतर गत वर्षा प्रमाणे याही वर्षी सर्व पञकारांच्या वतीने तहसिल कार्यालया समोर घेण्यात आलेल्या अभिवादन सोहळ्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ पञकार अशोक दगडे व प्रकाश पोवाडे यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. यासमयी पत्रकार राजेंद्र कांबळे,गंगाधर कूडके,माधव एडके,यादव लोकडे,साईनाथ शिरोळे,गौतम लंके,दिलीप घाटे,पि.जी. गायकवाड,बालाजी यलगद्रे,मार्तंड जेठे,नागेश माचापुरे,वाघमारे,शंकर बोडके,बाबु कुडकेसह तालूक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी,सामाजीक कार्यकर्त्यांसह बहूसंख्य नागरीकांची उपस्थीती होती.