लोह्यात माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व युवानेते प्रविण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हभप विशाल महाराज खोले यांच्या भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन

लोहा.
नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार. लोहा -कंधार मतदार संघाचे भाग्यविधाते लिंबोटी धरणाचे शिल्पकार प्रतापराव पाटील चिखलीकर व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बॅकेचे संचालक युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त .३आॉगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार हभप विशाल महाराज खोले यांचा भव्य किर्तन कार्यक्रमांचे दिपक पाटील कानवटे , केशव पाटील पवार, आवीनास पाटील पवार यांनी आयोजन केले आले आहे.
या कीर्तन सोहळ्यास ह भ प आत्माराम महाराज रायवाडीकर, ह भ प लक्ष्मीकांत महाराज लोहेकर, गायनाचार्य गणेश रावजी माळेगावकर, सदानंद महाराज रायवाडीकर ,पप्पू महाराज पोले ,सोपान महाराज फळेकर ,मृदंगमणी राजाभाऊ गुरुजी सोनमांजरेकर, मृदंग सम्राट विशाल महाराज बाबुळगावकर
यांच्या कार्यक्रमांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिपक पाटील कानवटे, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार, अविनाश पाटील पवार यांनी केले आहे.