भाजपच्या नेत्या पंकजा मुंडें यांची विधानपरिषदेवर निवड झाल्या निमित्त अंतरवाली सराटीत जल्लोष
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी
अंतरवाली सराटी विधानपरिषद निवडणूक विजयी झाल्याने अंबड तालुक्यातील येथील अंतरवाली सराटी येथे शनिवारी फटाके फोडून तसेच गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
यावेळी वडीगोद्री रामगव्हाण टाका पिठोरी सिरसगाव धाकलगाव नालेवाडी रेनापुरी चन्नापुरी शहागड एकनाथ नगर कृष्ण नगर महाकाळा समर्थ कारखाना येथील गावकऱ्यांच्या वतीने गावात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला व अंतरवाली सराटी येथे विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याने हा आनंद उत्सव साजरा करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले