उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या वाढदिवसाचा भाजप पदाधिकार्यांना विसर
भोकर(प्रतिनिधी)राज्याचे उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या वाढिदिवसानिमित्त भाजप पदाधिकार्यांकडून भोकर शहरात कूठे बॅनर लावल्याचे निदर्शनास आले नाही ना कूठे सामाजीक उपक्रम राबविले नसल्याने भाजप कार्यकर्त्यामध्ये मरगळ आली की काय अशी चर्चा राजकिय क्षेत्रात होत आहे.
एकिकडे उपमूख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी भोकर शहरात दणदणीत साजरा केल्याचे पहावयास मिळाले त्याच दिवशी भाजपाचे जेष्ठ नेते तथा उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचाही वाढदिवस होता भोकर येथील भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी फडणविस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात साधे शूभेच्छा बॅनर लावले नाही ना कोणतेही सामाजीक उपक्रम राबविण्यात आले नाही यामूळे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्त्यामध्ये मरगळ आली काय अशी चर्चा राजकिय क्षेत्रात होत आहे
कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा वाढदिवस असो भोकर शहरात त्या त्या पक्षाचे कार्यकर्त्याकडून बॅनर झळकतात उपमूख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने शहरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बॅनर लावल्याचे दिसून आले परंतू राज्याचे उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्ते एकही बॅनर लावले नाही त्यामूळे भाजप कार्यकर्ते पदाधिकार्यात मरगळ आली की काय अशी चर्चा राजकिय गोटात आहे..