भोकर(प्रतिनिधी)लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे यांनी मातंग समाजाच्या विविध न्यायोचित मागण्यांच्या संदर्भाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर”अमरण उपोषण “करित आहेत मातंग समाजाला त्यांच्या हक्काचा वाटा मिळाला पाहिजे हि प्रमूख मागणी सकल मातंग समाजाच्या हिताची असताना प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही
परिणामी लो.स्व.आं.सं.अ. प्रा.रामचंद्र भरांडे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून समाजहिताच्या मागण्या लक्षात घेवून शासनाने सदरील मागण्या तात्काळ सोडवाव्यात याकरिता लोकस्वराज्य आंदोलन भोकरच्या वतीने बालासाहेब टिकेकर यांच्या नेतृत्वाखाली बायपास नारवट रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले रास्ता रोको आंदोलनात सूनिल जाधव संजय चिंचोळकर साईप्रसाद जळपतराव लक्ष्मण सूर्वेसकर माधव वाघमारे सह असंख्य समाजबांधव सहभागी होते.