Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रेमप्रकरणातून भावाचा निर्घृण खून – भावजयीच्या मदतीने प्रेत तलावात फेकले

तरुण भारतbyतरुण भारत
November 13, 2025
in crime
0
0
SHARES
182
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


बदनापूर / जालना – बदनापूर तालुक्यातील निकळज शिवारात तब्बल एका महिन्यापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा थरारक खून उघडकीस आला आहे. प्रेमसंबंधाच्या वादातून भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून करून, भावजयीच्या मदतीने प्रेताचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी सुमारास निकळज शिवारातील वाला–सोमठाणा तलावात प्लास्टिकच्या मुरघासाच्या बोथमध्ये एक अनोळखी प्रेत स्थानिक नागरिकांच्या नजरेस पडले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्री. एम.टी. सुरवसे व त्यांचा पथक घटनास्थळी दाखल झाले. तलावातून प्रेत बाहेर काढून ओळख पटविली असता, मृतदेह हा परमेश्वर राम तायडे (वय 30, रा. सोमठाणा, ता. बदनापूर) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

प्राथमिक चौकशीतच हा मृत्यू नैसर्गिक नसून, अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने केलेला खून असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मयताचे वडील रामनाथ तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले.

चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली की, मयताचा लहान भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे (वय 28) याचे आपल्या भावजई मनिषा परमेश्वर तायडे (वय 25) हिच्याशी अनैतिक संबंध होते. मयत परमेश्वर याला या संबंधांची माहिती मिळाल्याने तो दोघांना रोखत होता. त्यामुळे अडथळा दूर करण्याच्या हेतूने दोघांनी मिळून 15 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास कुर्‍हाडीने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून परमेश्वरचा खून केला.

खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह प्लास्टिकच्या मुरघासाच्या बोथमध्ये भरून दोरीने घट्ट बांधला आणि दगड बांधून वाला–सोमठाणा तलावात फेकून दिला.

या भीषण गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे हे करीत आहेत.

सदर कारवाई अजयकुमार बंसल (पोलीस अधीक्षक, जालना), आयुष नोपानी (अपर पोलीस अधीक्षक, जालना) आणि अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश राठोड, पोउपनि संतोष कुकलारे, पोहेकॉ इस्माईल शेख, पोकों अब्दुल बारी, मपोकों प्रीती जाधव, पोकों गोपाळ बारवाल, चालक पोकों राम सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या घटनेने बदनापूर तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रेमसंबंधाच्या वादातून उभा राहिलेला हा कौटुंबिक खून गावात चर्चेचा विषय ठरला आहे.

Post Views: 464
Previous Post

समर्थांचा बलोपासनेचा मंत्र राष्ट्रीयत्वासाठी पूरक – आ.संजय बनसोडे

Next Post

वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी परीक्षेचा ताण तणाव विषयक मार्गदर्शन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी परीक्षेचा ताण तणाव विषयक मार्गदर्शन

ताज्या बातम्या

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

युवा पॅंथर संघटनेच्या वतीने नूतन महापौर उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला.#सोलापूर #महानगरपालिका

February 14, 2026

नॅबच्या दिव्यांग मुलांनी मिळवले यश.#viral #marathinews #public #popular #दिव्यांग

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679630

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697