मुदखेड ता प्र
मुदखेड शहरातील केंद्रीय रिझर्व पोलीस बलच्या संरक्षण भिंतीवरील तार कापून चंदन चोरीच्या उद्देशाने प्रवेश करणाऱ्या एकास अटक करण्यात आली.
केंद्रीय रिझर्व पोलीस बलच्या गस्ती दरम्यान अधिकारी व जवानांनी एका चंदन चोराला ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली. आरोपीला मुदखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
दि २ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गस्त सुरू असताना केंद्रीय राखीव बलाच्या अधिकारी व जवानांनी सुरक्षा भिंतीला फोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत असताना पकडण्यात आले सदरील व्यक्तीची चौकशी केली असता
त्याने स्वतःचे नाव आबेद अहमद पठाण (रा.घाटमारी ता.सिल्लोड जि.संभाजीनगर) येथील रहिवाशी असल्याचे सांगितले व सदरील प्रकरणातील त्याचा साथीदार मुख्य आरोपी नासिर हरूनखा गोलवान (रा.जिंजाळा ता. सिल्लोड जि.संभाजीनगर)हा आरोपी फरार झाला असल्याचे सांगितले. त्यांचे मुख्य काम परिसरातील चंदनाची झाडे चोरून संभाजीनगर जिल्ह्यातील तस्कराला विक्री करत असल्याचेही उघडकीस आले.
यापूर्वीही परिसरातील व शेतातील चंदनाची झाडे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. केंद्रीय पोलीस दलाच्या एएसआय प्रकाश जाधव यांच्या फिर्यादीवरून मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणाची चौकशी पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बलवीर सिंग ठाकूर हे अधिक तपास करीत आहेत.
केंद्रीय पोलीस बल मुदखेड चे नूतन आय जी सी.टी. व्यंकटेश यांच्या निर्देशानुसार जॉकी कुमार सहाय्यक कमांडर यांच्या नेतृत्वाखाली जलद कृती दलातील आप्पासाहेब शिंदे,रावण आघोने,वाल्मीक मराठे,सतपाल सिंह,शरद पवार,रामदास साळुंके,लक्ष्मण धाकन, कौतिक बाबुल आधी जवानांनी गस्त घालत असताना चंदन चोराला पकडले,
आरोपी कडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल मध्ये केंद्रीय राखीव पोलीस बल या जागेचे मॅप लोकेशन आढळले त्याचबरोबर निमज येथील केंद्रीय राखीव पोलीस बलाचे देखील मॅप आढळून आल्याने खळबळ उडाली असून चंदन चोरीच्या नावाखाली कुठला मोठा घातपात करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.