*अ.भा. छावा संघटनेच्या वतीने प्रशासनास विविध मांगण्यांचे निवेदन,मांगण्या मान्य न झाल्यास छावा संघटनेचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा.
भोकरदन : अ.भा.छावा संघटनेच्या वतीने आज उपविभागीय कार्यालयामार्फत विविध मांगण्याचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.
निवेदनात सिल्लोड भोकरदन शटल बससेवा सुरु करण्यात यावी,जाफ्राबाद डेफो अंतर्गत भोकरदन बसस्थानकात बसची संख्या वाढवण्यात यावी, परिवहन विभागात वाहक,चालक,व लिपिक पदाची भरती तात्काळ करण्यात यावी,तालुक्यातील मौजे गोकुळ,मुठाड या गावाला बससेवा सुरू करण्यात यावी, मौजे मालखेडा येथे मुख्य महामार्गावर गतिरोधक बसवण्यात यावे,या राज्य परिवहन विभागाकडे केलेल्या मांगण्यासह जालना जिल्हासह तालुक्यातील केंद्रिय प्राथमिक शाळांमध्ये सोलार पॅनल बसवून जे अगोदर सोलार पॅनल बसवले आहे त्यांच्या बॅटरीक उपलब्ध करून याव्या अशी मांगणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली.
तालुक्यातील श्रावणबाळ योजनेच्या प्रलंबीत प्रस्ताव,फाईली मंजुर करण्यात याव्या आदी मांगण्यांचे निवेदन प्रशासनास देऊन संबंधीत मांगण्या 12 आॅगष्टपर्यंत मान्य झाल्या नाही तर अ. भा. छावा संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील ठाले यांच्या नेत्रुत्वात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवेदनावर संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष गजानन गायकवाड,तालुका अध्यक्ष विष्णु पाटील गाढे,जिल्हा सचिव सुखदेव सिरसाठ,तालुका उपाध्यक्ष अंकुश साबळे,शहराध्यक्ष नंदकिशोर जाधव,तालुका प्रसिद्धी प्रमुख अप्पासाहेब जाधव,तालुका सचिव गजानन घोडके,शाखाअध्यक्ष फेरोज शेख आदींच्या स्वाक्षर्या आहेत.