Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

छाती जड झाली, चेहऱ्याला मुंग्या; हेल्दी लाइफस्टाइल असूनही श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक का आला? स्वतः सांगितलं कारण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 11, 2024
in entertainment
0
छाती जड झाली, चेहऱ्याला मुंग्या; हेल्दी लाइफस्टाइल असूनही श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक का आला? स्वतः सांगितलं कारण
0
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे याच्या एका हार्ट अटॅकने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. आता तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे श्रेयसने सांगितलं आहे.

 

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. तो अनेकांचा लाडका अभिनेता आहे. हिंदी सिनेसृष्टीतही तयाने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. कित्येक तरुणी तर आजही त्याच्यावर फिदा आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मधून त्याची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढली. मात्र महिन्याभरापूर्वी श्रेयसने सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं. श्रेयसला अचानक हार्ट अटॅक आला आणि सगळेच हादरले. त्याला नेमकं काय झालं हेही कळायला मार्ग नव्हता. सगळेच चिंतेत पडले. धावपळ सुरू झाली. त्याला इस्पितळात दाखल करण्यात आलं. चाहते त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करू लागले. तो या मोठ्या संकटातून वाचला. मात्र अगदी निरोगी असलेल्या श्रेयसला हार्ट अटॅक कसा काय आला असा प्रश्न तेव्हा अनेकांच्या मनात येऊन गेला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने त्यामागचं कारण सांगितलं आहे. यासगळ्याची चाहूल त्याला १ वर्ष आधीही लागली होती असं त्याने म्हटलं आहे.

 

​माझ्या शरीराने मला बराच वेळ दिला​

श्रेयस आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदे यांनी नुकतीच ‘माझा कट्टा’ वर हजेरी लावली होती. या मुलाखतीत बोलताना श्रेयस म्हणाला, ‘मी ना दारू पितो, ना सिगारेट पितो, ना तेलकट खातो, ना तळलेलं खातो तरीही मला अटॅक आला. मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे होऊ कुणाबरोबरही होऊ शकतं. पण मी फक्त शरीराची काळजी घेत होतो, जेवणाकडे लक्ष देत होतो, व्यायाम होता त्यामुळे माझ्या शरीराने मला बराच वेळ दिला. म्हणजे अटॅक आल्यापासून ते इस्पितळात दाखल होईपर्यत माझ्याकडे जवळजवळ दीड तास होता.

 

​पहिल्यांदा शरीराबद्दल ऑड जाणवलं​

हल्ली आपण बघतो की क्रिकेट खेळताना कुणीतरी पडतं, जिममध्ये जास्त व्यायाम केल्याने कुणीतरी पडतं आणि जागेवर जातं. तेव्हा शरीर तुम्हाला वेळ देत नाही. पण मला तो मिळाला. दुसरी गोष्ट अशी की ऑक्टोबर २०२२ मध्ये मला पहिल्यांदा माझ्या शरीराबद्दल काहीतरी ऑड जाणवलं. मला दमल्यासारखं वाटलं. तेव्हाही मी दुर्लक्ष नाही केलं. मी थेट डॉक्टरांना हॉटेलला बोलावलं. २ वेळा ईसीजी करून घेतला. तो नॉर्मल आला. नंतर मी मुंबईला आल्यावर पुन्हा इस्पितळात गेलो. पुन्हा सगळे चेकअप करून घेतले. तेव्हा मात्र थोडा कोलेस्ट्रॉल वाढलेला. त्यावरची औषधं सुरू केली.

 

माझी फॅमिली हिस्ट्री खूप स्ट्रॉन्ग आहे​

तिसरी गोष्ट अशी की माझी फॅमिली हिस्ट्री खूप स्ट्रॉन्ग आहे. माझे वडील, माझे काका, माझे आजोबा, माझी आत्या सगळेच हार्ट अटॅकने गेले. माझ्या वडिलांना पण झालं होतं पण सुदैवाने ते वाचले आणि औषध उपचार वगरे करून ते पुढचे २० वर्ष ते जगले. पण ४० ते ५० च्या वयात आमच्या घरातल्या बऱ्याच जणांना ते झालंय. त्यामुळे माझ्या डोक्यात कुठेतरी ते होतं की मला काळजी घ्यायची आहेच. माझं काम असं आहे, लाइफस्टाइल अशी आहे. मला बाहेर जावं लागतं खावं लागतं. त्यामुळे हे सगळं झाल्यावर मी आधी म्हटलं चेकअप करून घेऊया.

 

शरीराकडे दुर्लक्ष झालं​

मला कुणीतरी विचारलं की स्ट्रेस खूप होता का? तर स्ट्रेस असा नाही. मी जे चित्रपट करतोय त्यात मी मानसिकदृष्ट्या आनंदी आहे. पण शारीरिकदृष्ट्या हो. सतत कामं असल्याने माझं शरीराकडे दुर्लक्ष झालं. त्यादिवशीही तसंच झालं. ‘वेलकम’ चं शूट होतं. ८- १० किलोचं वेट आमच्या शरीराला बांधलेलं. मी इतर सगळ्यांसोबत मस्ती करत होतो शूट करत होतो. मी अक्कीला (अक्षय कुमार)ला म्हणालो पण की शूट झाल्यावर लारा दत्ताला भिजवूया. असं सगळं सुरू होतं. शूट संपलं. मी व्हॅनकडे चालायला लागलो आणि एक वेगळाच थकवा मला जाणवला.

 

​छाती खूप जड झाली​

तो थकवा मी आयुष्यात कधी अनुभवला नव्हता. मी कसाबसा चालत व्हॅन पर्यंत गेलो. कपडे ते ओले बदलले. मी बाहेर येऊन झोपलो. मेकअप मॅनने विचारलं मला काय झालं. मी म्हणालो, काही नाही गाडी आली? तो म्हणाला हो. मी बूट घालायला वाकलो पण छाती खूप जड झाली. मी चप्पल घातली आणि गेलो. गाडीत माझा डावा हात दुखायला लागला. मी विचार केला की ते लटकलो, पडलो म्हणून दुखत असेल. म्हणून मी थेट घरी गेलो. दिप्तीला सांगितलं.

Post Views: 68
Previous Post

बालेवाडीत देशातील पहिले ऑलिम्पिक भवन म्युझियम बांधण्यात येणार – अजित पवार

Next Post

अनेकांसोबत बरेच चॅट, पण…; घोसाळकरांना संपवणाऱ्या मॉरिसच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अनेकांसोबत बरेच चॅट, पण…; घोसाळकरांना संपवणाऱ्या मॉरिसच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?

अनेकांसोबत बरेच चॅट, पण...; घोसाळकरांना संपवणाऱ्या मॉरिसच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?

ताज्या बातम्या

दोन गटाच्या मारहाणी मध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.#viral #marathinews #public

February 15, 2026

तांदुळवाडी मध्ये महिला मेळावा संपन्न.#public #solapurnews #viral #trending

February 15, 2026

बदनापूर मध्ये गुटख्याच्या साठ्यासह अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल व वाहन जप्त.#public #marathinews

February 15, 2026

अमृतेश्वर गोमुख संस्थान मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन.#viral #solapurnews #public

February 15, 2026

भोकरदन तालुक्यात मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड.#viral #public #tranding

February 15, 2026

डॉ. सुधा फडके यांचे निधन..#viral #public

February 15, 2026

टिपू चे कौतुक केल्याबद्दल सपकाळांवर गुन्हा दाखल.#viral #पब्लिक #public

February 15, 2026

माहूर मध्ये मासरेड अंतर्गत अवैधरित्या हातभट्टी दारूचे दोन अड्डे उद्ध्वस्त..#viral #पब्लिक

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0682242

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697