मंठा प्रतिनिधी — मंठा शहरात मागील पंधरा वर्षापासून साई मित्र मंडळाच्या वतीने मंठा ते शिर्डी पदयात्रा जाते . तारीख 10 शनिवार रोजी मंठा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून साई भक्तांनी प्रस्थान केले यावेळी शिवसेना शहर प्रमुख तथा बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रथातील साई मूर्तीची पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी साई भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.याप्रसंगी माजी सभापती संतोष वरकड , नगरसेवक अचित बोराडे , दीपक बोराडे यांच्यासह साई भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.