करकंब प्रतिनिधी :- जागर स्वच्छता अभियान टीम करकंबच्यावतीने श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी तळ न्यू.इंग्लिश स्कूल करकंब येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो वारकऱ्यांचा मेळा मानाच्या पालख्यांसमवेत जात असतो.
आज करकंब येथे संत निवृत्तीनाथ,संत एकनाथ,संत निळोबाराय,संत जनार्दन स्वामी,संत श्रीराम मुक्ताबाई,यांच्या बरोबर लाखो वारकऱ्यांची मांदियाळी करकंब नगरीमध्ये विसावणार आहे.त्यानिमित्ताने जागर स्वच्छता अभियान टीमच्यावतीने खारीचा वाटा म्हणून शनिवार व रविवार रोजी जागर स्वच्छता अभियान टीमच्यावतीने पालखीतळाची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
जागर स्वच्छता अभियान टीमच्या स्वच्छतादुतांनी पालखीतळ परिसराची स्वच्छता केली.यावेळी जागर स्वच्छता टीमची संकल्पक अंजली टकले,वृषाली बोधे,अमृता रसाळ,ज्ञानेश्वर दुधाणे,रमेश खारे,धोंडीराम भाजीभाकरे,संतोष भोसले,जागरटीम सदस्य उपस्थित होते.यावेळी न्यू. इंग्लिश स्कूल करकंबच्या विद्यार्थ्यांनीही विशेष सहकार्य केले. शनिवार,रविवारी अनेक पालख्या, दिंड्या करकंबनगरीत येणार असून त्यानिमित्त प्रत्येक परिवाराने आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आव्हान जागर स्वच्छता टीमच्यावतीने करण्यात आले आहे.