भगवा सप्ताहाची सांगता
वाळूज महानगर (प्रतिनिधी) : भगवा सप्ताह निमित्ताने बजाजनगर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या हस्ते बजाजनगरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे बजरंगबलीची पूजा व आरती करून सप्ताहाची सांगता करण्यात आली.
महाराष्ट्र मध्ये सर्वांना सुख समृद्धी, शेतकरी कामगारांना सुखाचे दिवस येवोत अशी मनोकामना करत भक्ती भावाने आरती व पूजा करून भगवा सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, अरविंद धिवर, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे, \
उपतालुकाप्रमुख विशाल खंडागळे, माजी पंचायत समिती सदस्य तथा लक्ष्मण लांडे, उपविभागप्रमुख लघू खराटे, अनिल बारस्कर, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र चव्हाण, भाऊसाहेब बनकर, रामभाऊ झंपलवाड, अक्षय मुरादे, माधव काळे, सुधाकर करपे, पंढरीनाथ चोपडे, राहुल संभेराव,गणेश आहिरे, प्रबल परदेसी,रोहित राऊत,संकेत सर्जे,योगेश मुरादे,कृष्णा बिरादार,प्रतीक चव्हाण,रितेश चव्हाण,शुभम भोसले,अविनाश प्रधान,गौरव गोरडे, विश्वास संगेकर,किशन पवार आदींची उपस्थिती होती.