*श्री बालाजी मंदिर मुदखेड येथे श्रीमद् भागवत महापुराणचे आयोजन*
मुदखेड ता प्र
मुदखेड येथे दि १४ जुलै रविवार ते दि.२० जुलै शनिवार वेळ दुपारी २ ते ५ या वेळेत श्रीमद् भागवत महापुराणचे आयोजन बालाजी मंदिर, मुदखेड येथे करण्यात आले आहे.
मुदखेड येथील श्री बालाजी मंदिर कासार गल्ली, येथे महापुराण कथा ब्रह्माशंकर शास्त्री वृंदावनवाले यांच्या समधुर वाणीतून आयोजित केली आहे.
गेल्या ५९ वर्षापासून भागवत महापुराण कथेचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील श्रीमद् भागवत महापुराण कथेचे अयोजन श्री बालाजी मंदिर संस्थान व गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते गिरीष कोत्तावार व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
तरी या श्रीमद् भागवत महापुराण जास्तीत जास्त,भक्तगण,यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या नयनरम्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बालाजी मंदिर संस्थान व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.