नांदेड – तेजस्विनी पुपलवाडचे एमबीबीएसला प्रवेश मिळाल्याबद्दल कुटुंबियांकडून अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य प्रवेश नियामक समितीद्वारे एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमांच्या २०२५-२६ मध्ये राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील स्वीय सहाय्यक कैलास पुपलवाड व तसेच जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सिडको नांदेड येथे सहा. प्राध्यापिका डॉ. सत्वाशीला वरगंटे (पुपलवाड) यांची मुलगी कु. तेजस्विनी पुपलवाड हिचा अनुसूचित जमातीच्या राखीव कोट्यातून मालती मेडिकल कॉलेज, मूर्तिजापूर अकोला येथे एम.बी.बी. एस. अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्याबद्दल तीचे आई व वडील, नातेवाईक, गुरुवर्य व मित्रमंडळी यांनी सर्वांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.



















