काँग्रेसचे प्रवक्ते असलेले रोहन गुप्ता यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी आज, गुरुवारी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. विशेष म्हणजे काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीत गुजरातमधून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी तिकीट परत केले होते.
यापूर्वी काँग्रेसचे मोठे प्रवक्ते असलेले प्राध्यापक गौरव वल्लभ यांनीही पक्षत्याग करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. गुप्ता यांनी मार्चमध्येच काँग्रेसचा निरोप घेतला होता. काँग्रेसच्या संपर्क विभागातील एका वरिष्ठ नेत्याकडून ‘सतत अपमान आणि चारित्र्यावर प्रश्नचिन्ह’ असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र, त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. काँग्रेसने गुप्ता यांना अहमदाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, परंतु त्यांनी 18 मार्च रोजी आपले नाव मागे घेतले होते.