11 जुलै (हिं.स.) : कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्याचेनामांतर बंगळुरू-दक्षिण असे करण्याचा विचार सुरू आहे. राज्यातील काँग्रेससरकारच्या या निर्णयाला भाजपा आणि जनता दल सेक्युलरने (जेडीएस) विरोध सुरू केलाय. जिल्ह्याच्यानामांतरावरून राज्यात वाद निर्माण झालाय.कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचे नाव बदलूनबंगळुरू दक्षिण असं करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्याकडे पाठवलाआहे. शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणीकरण्याची ही दुसरी वेळ आहे.
शिवकुमार आणि इतर काही जणांनी सिद्धारामैय्यायांच्याकडे एक पत्रक देत रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून बंगळुरू दक्षिण करण्याचीविनंती केली आहे. रामनगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी मुख्यमंत्र्यांना दिलेल्यापत्रकावर डी. के. शिवकुमार यांच्यासह 13 जणांनी सह्या केल्या आहेत. त्यामध्येपरिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी, बंगळुरू ग्रामीणचे माजी खासदार डी.के. सुरेश यांचाही समावेश आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतरशिवकुमार यांनी सांगितले की,
बंगळुरू शहराला असलेल्या जागतिकप्रतिष्ठेचा फायदा शहराजवळ असलेल्या रामनगर, मगदी, कनकपुरा, चन्नपटना आणि हरोहल्ली तालुक्यांना व्हावाहा नाव बदलण्याची मागणी करण्यामागचा उद्देश आहे.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी सांगितले की, रामनगरजिल्ह्याचे नाव बदलण्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीपुढाकार घेतला आहे. ते रामनगर जिल्ह्याचा कधीही विकास करणार नाहीत. त्यांनी मेडिकलकॉलेजसुद्धा कनकपुरा येथे स्थलांतरीत केले आहे.
लोक हे मान्य करणार नाहीत. तर माजीमुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटमध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतरआम्ही पुन्हा एकदा या जिल्ह्याचे नाव रामनगर करू, असा इशारादिलाय. दरम्यान, भाजपा नेते शहजाद पुनावाला यांनी सांगितलेकी, सध्याच्या काँग्रेस पक्ष हा हिंदू धर्माचा द्वेश करतो.तसेच या पक्षाची रामविरोधी मानसिकता शिगेला पोहोचली आहे. आपण राम जन्मभूमीआंदोलनाला पराभूत केले, असा दावा राहुल गांधी यांनी हल्लीचकेला होता. आता श्री रामांच्या नावावरून असलेले रामनगर काँग्रेसला नावडते झालेय असाआरोप पुनावाला यांनी केला आहे.