मुदखेड ता.प्र
भोकर विधानसभा मतदार संघातील मुदखेड,अर्धापूर भोकर या तीन तालुक्यातील २०० ते ३०० वारकरी महिला, पुरुष पायी दिंडी पंढरपूरला दि २४ जून सोमवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या श्रीसत्यगणपती मंदिर देवस्थान दाभड तालूका अर्धापूर येथून रवाना झाली आहे.या पायी जाणा-या वारकरी दिंडीला दादाराव ढगे पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून भगवा झेंडा दाखवून रवाना झाली आहे.
भोकर मतदार संघातील तिरकसवाडी येथिल श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कै.तुकारामजी बापु आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रवाना झाली आहे.
भोकर विधानसभा मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या युवा नेत्या इजि.कु. दामिनी ताई यांचे वडील दादाराव पाटील ढगे यांनी तिरकसवाडी येथिल एक वारकरी पायी दिंडी पंढरपूरला पाठवली आहे.दादाराव ढगे पाटील यांच्या वतिने भोकर मतदार संघात नेहमीच सामाजिक कामे केली जातात.सोमवारी अर्धापूर तालुक्यातील श्री सत्यगणपतीची विशेष महाआरती करून वारकरी पंढरपूरला रवाना झाले आहेत.यावेळी वसंत नाईक चितगिरी तांडा, रंगराव नाईक रामुनाईक तांडा, छत्रपती पाटील राजेगोरे, देविदास नाईक, साहेबराव चव्हाण फुलवाडी तांडा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.