*भेटी प्रसंगी शालेय साहित्य वह्यांचे केले प्रकाशन*
मुदखेड ता प्र
भोकर विधानसभेतील भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील गोरगरीब महिलांसाठी साडी चोळी व आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये रोक रकम देऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात आला होता.
व तसेच दादाराव पाटील ढगे यांनी चिदगिरी येथील मंदिरातील महाराज यांना 12 लाखाची बोलेरो गाडी घेऊन दिली असे अनेक सामाजिक उपक्रमात ते नेहमीच अग्रेसर असतात
त्यांच्या या सामाजिक कार्याला पाहून विधानसभेतील नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जनतेचा प्रतिसाद पाहून दादाराव पाटील ढगे यांची कन्या इजि.कु.दामीनीताई दादाराव पाटील ढगे ह्या आगामी भोकर विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असुन या अनुषंगाने दादाराव पाटील ढगे यांनी भोकर विधानसभेतील वाडी तंडयात जाऊन भेटी गाठी घेत असल्याने दादाराव पाटील ढगे यांना वाडी तंडयातील नागरीकांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
तसेच सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी मागील दोन दिवसा पूर्वी मुंबई येथे जाऊन काँगेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले,आमदार अमित देशमुख, यांच्या हस्ते भोकर विधानसभेच्या इच्छूक उमेदवार इजि.कु.दामिनीताई दादाराव पाटील ढगे व काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र असलेल्या शालेय साहित्याचे प्रकाशन करण्यात आले.
त्याच प्रमाणे पुढील आठवड्यात नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर विधानसभेतील मुदखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पन्नास हजार वयांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.