भोकर(प्रतिनिधी)रेल्वे हद्दीतील अनाधिकृत बांधकामास परवानगी देणाऱ्या नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्या वर कारवाई करुन विमल इंग्रजी शाळेची ईमारत पाडण्यात यावी या मागणीसाठी दि.१३ आँगस्ट पासून उपविभागीय अधिकारी भोकर कार्यालया समोर आमरण उपोषणाचा इशारा स्वप्निल केशवराव गाढे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
भोकर शहरातील विमल इंटरनँशनल स्कूल च्या संचालकांनी वार्ड क्र.२ गट क्र.५५४ मध्ये भव्य इमारत अनाधिकृत पणे रेल्वे हद्दिच्या जागेत उभारली.सदर बांधकामाची चौकशी करून बांधकामाची परवानगी देणारे मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करून अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी स्वप्नील गाढे यांनी २५ जुन,८ जुलै,११ जुलै,१५ जुलै २०२४ दरम्यान संबधितांकडे वारंवार लेखी स्वरूपात तक्रार केली होती. परंतु अद्यापही कोणतीही योग्य ती कारवाई करण्यात न आल्याने लोकशाही मार्गाने अमरण उपोषणाचा मार्ग पत्करला असुन मुख्याधिकारी यांनी विमल इंग्लिश स्कुल च्या इमारती साठी किती क्षेत्रफळाची परवानगी दिली,
परवानगी देते वेळेस रेल्वे विभागाचे ना हरकत घेतले काय,अंदाजपत्रक जागेचा नकाशा जायमोक्यावर जावून चौकशी केला का या सर्व बाबींची रीतसर चौकशी करून अनाधिकृत बांधकाम त्वरित जमीनदोस्त करून या बांधकामास परवानगी देणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी दि.१३ आँगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा स्वप्नील गाढे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी,भोकर तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.