Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांना फोन करुन शपथविधीचं निमंत्रण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 5, 2024
in top news
0
देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांना फोन करुन शपथविधीचं निमंत्रण
0
SHARES
133
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, 5 डिसेंबर (हिं.स.)। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस विराजमान होणार हे आता निश्चित झाले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुपारी तीन वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार यावेळी फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीही शपथ घेतील.

आज दुपारी तीन वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होईल.यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याच कार्यक्रमात अजित पवार हेदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत अस्पष्टता होती. मात्र आता शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तेदेखील याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.आझाद मैदानावर होणाऱ्या शपथ विधी सोहळ्याला जमा होणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता या परिसरात एकूण १५०० पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, शपथविधीच्या या कार्यक्रमाल अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये खासदार शरद पवार यांचादेखील समावेश आहे. त्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना देखील आजच्या शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनादेखील या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी आज शरद पवार यांना फोन करून शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्यामुळे शरद पवार यांना शपथविधीच्या कार्यक्रमला येता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली होती. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.मात्र आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवून फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन कॉल करून शपथविधीच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळातून स्वागत केले जात आहे. दुसरीकडे या शपथविधीच्या कार्यक्रमामुळे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात उत्साह संचारला आहे. संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील येणार आहेत. त्यामुळे त्यांच्याही स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. त्यामुळे आता शपथविधीच्या कार्यक्रमात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे

Post Views: 13
Previous Post

बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवावेत- होसबळे

Next Post

निवघा परिसरात खुलेआम मटका चालू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
निवघा परिसरात खुलेआम मटका चालू

निवघा परिसरात खुलेआम मटका चालू

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक ऐवजी झाडू..#viral #public

February 13, 2026

संजय पैठणकर यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला.’खूप शिका, पण आई-वडिलांना विसरू नका.

February 13, 2026

तीन महिने उलटून गेले तरीही या स्थळ संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही..#viral #solapurnews

February 13, 2026

1 हजार 32 कोटीच्या विकास कामांना मंजुरी.#viral #solapurnews

February 13, 2026

डीबी वुड या 45 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर शुक्रवारी (13 फेब्रुवारी) सकाळी अचानक भीषण आग.

February 13, 2026

इलेक्ट्रिक बसला लागली आग.50 कामगार सुखरूप.#public #marathinews #viral

February 13, 2026

लाडक्या बहिणींना मिळणार एकदम ६००० रुपये..#लाडकी_बहीण_योजना #ladkibahin

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान#public #trendingshorts

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678809

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697