जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे दिंडीचे आयोजन- विठ्ठल रूख्मिणीच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
सोयगाव,दि.१६ ( प्रतिनिधी)
आज उपक्रमशिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेत शाळा ते विठ्ठल रुक्मिणी मंदीर आमखेडा येथ पर्यत विद्यार्थींची दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थी रूद्र पवार यांने विठ्ठलाची तर कु.डिंपल ठोंबरे या विद्यार्थीनीने रूख्मिणी मातेची सुंदर अशी वेशभुषा केली होती.बाल वारकरी यांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाच्या जय घोषाने परीसर दणाणून सोडला.
यावेळी दिंडीसाठी अगस्तमुनी वारकरी संस्था आमखेडा येथील ह.भ.प.शरद पवार महाराज व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.जणू “पंढरीची वारी आहे माझे घरी” ‘पंढरीची वारी जयाचिये कुळी’पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे.आणि याचाच अनुभव मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगरच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही घेतला.दिंडी साठी शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील व सहशिक्षक गोपाल चौधरी यांनी परिश्रम घेतले.
सोबत फोटो –