सोलापूर – फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना उबाठाकडून पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना देण्यात आले.
पोलीस निरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार, मानसिक व शारीरिक छळ, तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष व राजकीय हस्तक्षेपाद्वारे आरोपींना संरक्षण यामुळे डाॅ. मुंडे यांच्या आत्महत्येविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याउलट पिडीतेला न्याय मिळण्याऐवजी तिच्याच चरित्रहननाचे प्रयत्न केले जात आहे . म्हणून स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी यंत्रणेद्वारे सखोल तपास करून आरोपी अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख अजय दासरी, महिला जिल्हा संघाटिका अमिता जगदाळे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर,भारती मुनोली, शशिकांत बिराजदार, रवींद्र नागणकेरी, रवी म्हेत्रे, रामसिंग धनिवाले, अशोक बोकेवाले, सुरेश शिंदे, नाना मोरे, मीनाक्षी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.



















