दक्षिण सोलापूर – लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची रणनिती व माजी आमदार रतिकांत पाटील यांची व्यूहरचना यामुळे भाजपच्या लाटेतही हत्तूरच्या बालेकिल्यात लक्ष्मीताई पाटील यांना ३४ मतांनी निसटता विजय मिळाला. या विजयामध्ये शिवसेना जिल्हा उपप्रमुख आणप्पा सतुबर यांची भूमिकाही महत्वाची ठरली आहे.
जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी २०१७ च्या निवडणूकीत तिरंगी लढतीत हत्तूर जिल्हा परिषद गटावर भगवा फडकविला होता. यावेळी अमर पाटील, अप्पासाहेब पाटील व डाॅ. चनगोंडा हविनाळे यांच्या लढतीत अमर पाटील यांनी विजय मिळवून वर्चस्व सिध्द केला होता. यावेळी भाजप व शिवसेना मध्ये लढत होती. भाजपकडून उज्वला हविनाळे व शिवसेनेकडून लक्ष्मीताई पाटील यांच्यामध्ये ‘काॅंटे कि टक्कर’ लढत झाली. हविनाळे या माजी सभापती डाॅ. चनगोंडा हविनाळे यांच्या सून तर पाटील या शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मातोश्री . आमदार सुभाष देशमुख यांनी ही जागा प्रतिष्ठेची करून विजयासाठी ताकत लावली होती. तर अमर पाटील यांनी अस्तित्वाची लढत म्हणत मतदारांपर्यंत पोहोचले. या दोन्ही उमेदवारांमध्ये विजयासाठी अटीतटीची लढत झाली. मात्र शिवसेनेमधील कार्यकर्त्यांची एकजूट ही या विजयाचे गमक ठरले.
या गटामधील हत्तूर, औराद व आहेरवाडी या गावामध्ये सर्वाधिक मतदार आहेत. त्यामुळे साहजिकच या मतदारांच्या जोरावर जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार , हे निश्चित असल्याने हत्तूरमध्ये जिल्हा उपप्रमुख आणप्पा सतुबर यांनी शिवसेनेला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. हत्तूरमध्ये भाजप लाटेची कल्पना असल्यामुळे सतुबर यांनी लाडक्या बहीणी व मतदारांशी संपर्क साधून लक्ष्मीताई पाटील यांना मताधिक्य मिळवून दिला. शिवाय शिवसेनेचा बालेकील्ला ताब्यात ठेवण्यासाठी शिवसैनिक म्हणून मोलाची भूमिका पार पाडली. भाजपच्या नेत्यांनी हत्तूरमध्ये ठिया मारून व लढत प्रतिष्ठेची करून मताधिक्यासाठी प्रयत्न केला. मात्र जिल्हा उपप्रमुख सतुबर यांनी माजी आमदार पाटील व जिल्हाप्रमुख पाटील यांच्या सहकार्याने मताधिक्य वाढविण्यात यश मिळविल्याने हत्तूरमधून लक्ष्मीताई पाटील यांना ३४ मतांनी विजय मिळविणे सोईचे झाले. त्यामुळे भाजप लाटेतही सतुबर व पाटील यांच्या जोडीने मतदारांमध्ये किमया करून हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले.
….
चौकट
…
लाटेतही धनुष्यबाण चालला
…
हत्तूर जिल्हा परिषद गट शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही भाजपने ताकत लावून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोक कल्याणकारी कार्य व जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या जनसंपर्कामुळे हत्तूर जिल्हा परिषद गटावर शिवसेनेला विजय मिळविण्यात यश मिळाले. भाजप लाटेतही हत्तूरच्या मतदारांनी शिवसेनेला मतदान करून विकासाला साथ दिली आहे. त्यामुळे भविष्यात हत्तूरच्या विकासासाठी शिवसेनेचा धनुष्यबाण जोरात चालणार आहे.
आणप्पा सतुबर, शिवसेना, जिल्हा उपप्रमुख, सोलापूर
….
शिवसैनिकांच्या एकजूटीचा विजय
…
हत्तूर व औराद गावामधून शिवसेनेला मताधिक्य मिळाल्याने हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात राहीला आहे. हत्तूर जिल्हा परिषद गटामधील सर्व शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या नेतृत्वात एकजूटीने प्रयत्न केल्यामुळे लक्ष्मीताई पाटील यांना विजय मिळाला आहे.
योगिराज पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख, दक्षिण सोलापूर























