Monday, June 30, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अंड्या, बंड्या, ढोम्या, पश्या… टोपणनावात काय आहे? राज ठाकरेंच्या मुद्द्यावर मराठी कलाकार काय म्हणतायंत?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 10, 2024
in maharashtra
0
अंड्या, बंड्या, ढोम्या, पश्या… टोपणनावात काय आहे? राज ठाकरेंच्या मुद्द्यावर मराठी कलाकार काय म्हणतायंत?
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१००व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांच्या टोपणनावाचा मुद्दा अधोरेखित केला होता.

 

 

अलीकडेच १००व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत लक्षवेधी ठरली. याचं मुख्य कारण होतं त्यांनी अधोरेखित केलेल्या कलाकारांच्या टोपणनावाचा मुद्दा. ‘मराठी कलाकार एकमेकांना चारचौघांत टोपणनावानं हाक मारतात. असं करून कसं चालेल? कलाकारांनीच एकमेकांचा आदर केला नाही तर लोक तुमचा आदर करतील का?’, असा प्रश्न विचारून त्यांनी कलाकारांना सुनावलं. यानिमित्तानं मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांची टोपणनावं चर्चेत आली. राज ठाकरे यांच्या विधानाला सहमती दर्शवत काही कलाकारांनीही ‘टोपणनावात काय आहे?’ असं म्हणत सार्वजनिक ठिकाणी पूर्ण नावानंच हाक मारावी आणि आदर व्यक्त करावा असं मत मांडलं. तसंच टोपणनावानं हाक मारत प्रेक्षकांचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत असलं तरी महत्त्वाच्या व्यासपीठावर पूर्ण नावानंच संबोधावं अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

 

 

हा मनोरंजनाचा भाग नाही

राज ठाकरे यांनी यापूर्वीदेखील अनेकदा आम्हा कलाकारांशी या मुद्द्यावर बातचीत केलीय. त्यांची भूमिका स्वागतार्ह आहेच. टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये नटांवर, त्यांच्या नावावर वैयक्तिक विनोद करणं मला पसंत नाही. वैयक्तिक शेरेबाजी, विनोद हा मनोरंजनाचा भाग होऊ शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी टोपणनावानं जवळची व्यक्ती हाक मारते तेव्हा ते इतर लोक आणि विशेषतः लहान मुलंही ते ऐकतात. अशा वेळी अनोखळी व्यक्तीही ‘अंड्या’ म्हणून हाक मारू लागते. त्यामुळे राज ठाकरे यांचा मुद्दा आपण समजून घ्यायला हवा. सार्वजनिक ठिकाणी, समारंभात, टीव्ही कार्यक्रमात, मुलाखतीत व्यक्त होताना आपण एकमेकांना आदर द्यायलाच हवा. माझे जवळचे मित्र कलाकार मला कधीच ‘अंड्या’ म्हणून संबोधत नाहीत. ते आनंद अशीच हाक मारतात.

 

 

नाव कसं पडलं?

आनंद इंगळे यांना शालेय जीवनात त्यांचे मित्र अंड्या असं म्हणायचे. त्याच नावानं पुढे मनोरंजनसृष्टीतही त्यांना हाक मारू लागले.

 

आपलेपणा वाटतो

कोणी कोणाला काय नावानं हाक मारायचं हा त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्या कामातून आदर मिळावा; नावानं काय ओळखतात यातून नाही. कोणी आपल्याला ‘सर’ असं आदरानं म्हणत असतील आणि आपल्या मागे वाईट बोलत असतील तर काय उपयोग? मला अनेक जण ढोम्या, हेम्या, ढोमू अशी हाक मारतात. अगदी सोशल मीडियावरसुद्धा मला या नावांनी प्रतिक्रिया येतात. माझ्या मते, प्रेक्षकांनासुद्धा माझ्याविषयी तितका आपलेपणा वाटतो. मी त्यांना त्यांच्या घरातला वाटतो म्हणून ते मला त्या प्रेमाच्या नावानं बोलावतात.

 

 

नाव कसं पडलं?

पुण्याकडे आणि त्यापुढच्या भागात एखाद्याच्या नावाला किंवा आडनावाला ‘या’ असं जोडायची साधारण पद्धत आहे. त्यातूनच ते ढोमेचं ‘ढोम्या’ झालं; असं हेमंत सांगतो.

 

आदर द्यायला हवा

मी सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांना सचिनजी, अशोकजी अशीच हाक मारतो. आपणच आपल्या माणसांना चारचौघात आदर दिला तर ते पुढे समाजात प्रतिबिंबित होतं. मित्रांमध्ये असताना टोपणनावानं हाक मारली तर ठीक आहे. पण आपणच जागा, काळ, वेळ याचं भान ठेवत सर्वांना आदरानं संबोधलं पाहिजे. त्यांना त्यांच्या पूर्ण नावानं किंवा आदरार्थी हाक मारायला हवं. प्रेमानं मला सर्व ‘वाड्या’ किंवा नवोदित कलाकार ‘वाड्या काका’ हाक मारतात. याबाबत माझी हरकत नाही. परंतु, राजसाहेबांचा मुद्दा समजून घेऊन सार्वजनिक ठिकाणी आपण तसं जरुर वागायला हवं.

 

 

नाव कसं पडलं?

माझे गुरू सतीश पुळेकर आम्हा विद्यार्थ्यांना आडनावानं हाक मारायचे. पुढे मनोरंजनविश्वात अनेकांच्या तोंडी ‘वाड्या’ हे नाव अंगवळणी पडलं; असं जयवंत सांगतात.

 

कृतीतून सन्मान देणं आवश्यक

राज ठाकरे यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं महत्त्वाचा मुद्दा चर्चिला गेलाय. मीदेखील याकडे जाणीवपूर्वक लक्ष देईन. मला हेही सांगावंसं वाटतं की, आजच्या नवोदित कलाकारांना, पिढीला सर्व काही सहज मिळालं आहे; पण संस्कार मिळाले नाहीत. याला काही कलाकार अपवाद असतील. पण, बहुतांश ठिकाणी मी हे पाहिलंय की, ज्येष्ठ कलाकार सेटवर आल्यावर नवीन मुलं तशीच खुर्चीत बसून राहतात. आदरानं उठून उभं राहणं अपेक्षित आहे. समोरच्या व्यक्तीच्या कामाचा, अनुभवाचा आदर करणं भाग आहे. कलाकार आणि ज्येष्ठ व्यक्ती म्हणून आपण त्यांना सन्मान द्यायला हवा. आदर आपल्या मनात आणि कृतीतूनदेखील दिसायला हवा.

 

 

नाव कसं पडलं?

शालेय जीवनात प्रसादचं ‘पश्या’ हे नावं जवळच्या मित्रांमधून आलं आहे.

 

नाव पूर्ण घ्यावं

मला असं वाटतं, टोपणनावानं हाक मारण्यापेक्षा मला माझ्या मूळ नावानं ओळखलं गेलं तर मला ते अधिक आवडेल. मी राज ठाकरेंच्या मताशी पूर्ण सहमत आहे. माझ्या जवळच्या मित्रांनी माझी ‘पुष्क्या’ किंवा ‘पुष्की’ ही ठेवलेली नावं माझ्या खासगी आयुष्याचा भाग आहेत. परंतु, सार्वजनिक ठिकाणी किंवा समाजमाध्यमांमध्ये मला अगदी सर, दादा असं आदरानं नाही म्हटलं तरी चालेल; पण पूर्ण नाव घेतलं जावं.

 

 

नाव कसं पडलं?

सर्वसामान्यपणे अनेकांना जवळच्या व्यक्तीला संबोधण्यासाठी नावापुढे ‘या’ लावायची सवय असते. मित्रांमध्ये गप्पा मारताना सहजतेनं ‘पुष्की’ हे नाव प्रचलित झालं.

 

ओळख दाखवण्यासाठी

मित्रमैत्रिणींमध्ये असताना आपण एकमेकांना प्रेमळ किंवा टोपणनावानं हाक मारू शकतो. परंतु, सार्वजनिक ठिकाणी असं होणं चुकीचं आहे. राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर माझं आणि सिद्धार्थ जाधवचं या मुद्द्यावर बोलणं झालं. आम्ही चांगले मित्र आहोत; पण, यापुढे सार्वजनिक ठिकाणी आपण एकमेकांना पूर्ण नावानंच संबोधायचं असं ठरवलंय. बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी. सार्वजनिक ठिकाणी अनेकदा अनेक मंडळी ‘माझी किती ओळख आहे!’ हे दाखवण्यासाठी टोपणनावानं मुद्दाम हाक मारतात; हे खरंच चुकीचं आहे. पण, आता यापुढे असं घडणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी.

 

 

नाव कसं पडलं?

माझ्या जवळच्या एका मित्रानं मला ‘बंड्या’ हे नावं दिलं. सुरुवातीला ते आमच्यापुरतं मर्यादित होतं. नंतर ते मनोरंजनक्षेत्रातही म्हणू लागले, असं तेजू सांगते.

 

आपला सिद्धू; पण…

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ‘मटा’मध्ये मी क्रिकेट संदर्भातील एक लेख लिहिला होता. ज्यात क्रिकेटपटूंची नावं मी अनवधानानं एकेरी लिहिली होती. तो लेख वाचून त्यावेळी राजसाहेबांनी मला फोन करून सांगितलं होतं की, सार्वजनिक ठिकाणी उल्लेख करताना आपण आदर देणं आवश्यक आहे. राज ठाकरे यांनी कलाकारांप्रती असलेल्या प्रेम आणि आदरामुळे सांगितलं. त्यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे. खासगी आणि सार्वजनिक भान आपण राखायला हवं. मला प्रेमानं सर्व जण ‘सिद्धू’ असं म्हणतात. मला ते आपलंसं वाटतं. परंतु कार्यक्रमांमध्ये विशेषतः महत्त्वाच्या व्यासपीठावर कलाकारांनी एकमेकांना पूर्ण नावानं संबोधायला हवं.

 

 

नाव कसं पडलं?

‘जत्रा’ सिनेमात सिद्धार्थ जाधवच्या व्यक्त्तिरेखेचं नाव ‘सिद्धू’ असं होतं; तिकडून पुढे हे नावं त्याच्याशी जोडलं गेलं.

 

इतरांना आदर दिलाच पाहिजे

कलाकारांना टोपणनावानं हाक मारू नये, हे राज ठाकरे यांचं विधान योग्य आहे. आपल्याकडे टोपणनावानं हाक मारण्यासाह थेट अरे-तुरे केलं जातं, ते मला पटत नाही. स्वत:चा आदर केला जावा असं वाटत असेल तर त्यासाठी इतरांना आदर दिलाही गेला पाहिजे. अरे-तुरे करणं टाळलं पाहिजे. ‘तू’ आणि ‘तुम्ही’ या शब्दांसह ‘आपण’ याचाही वापर झाला पाहिजे. हे औपचारिक वाटतं असं काही जणांचं म्हणणं असतं; पण ती भाषा आहे. काही मित्र वैयक्तिक आयुष्यात त्याचं प्रसिद्धीकरण न करता टोपणनावानं हाक मारत असतील तर ते चालतं. पण त्यांची ओळख त्यांच्या पूर्ण नावानंच झाली पाहिजे.

– सचिन पिळगांवकर, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक

 

 

मान द्यायलाच हवा

अभिनेते पंढरीनाथ कांबळे आणि भालचंद्र कदम असं म्हटल्यावर कदाचित कोणाविषयी बोललं जातंय हे अनेकांना समजणार नाही. पण पॅडी कांबळे किंवा भाऊ कदम असा उल्लेख केला की, चटकन लक्षात येईल. कारण त्यांची तशीच नावं मनोरंजनसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये प्रचलित आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये आणि कलाकृतीच्या श्रेय नामावलीतही त्यांचं हेच नाव नमूद केलेलं असतं. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचंदेखील खरं नावं विश्वनाथ पाटेकर असं आहे. हीच नावं आता या कलाकारांची ओळख बनली आहे.

याविषयी ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे सांगतात, ‘कितीही जवळचे मित्र असलो तरी सामाजिक भान राखत समोरच्या मित्राला सन्मान द्यायला हवा. कारण, इतर मंडळी आपल्या कृतीचं अनुकरण करत असतात. वयानं, अनुभवानं मोठे असलेल्या कलाकारांनाच नव्हे तर सर्वांना संबोधताना मान देणं अपेक्षित आहे. आमच्या पिढीत ती कटिबद्धता होती; जी आम्ही आजही पाळण्याचा प्रयत्न करतो.’ भालचंद्र कदम याविषयी सांगतात, ‘घरात मला भाऊ म्हणून हाक मारतात. मनोरंजन क्षेत्रात काम करू लागलो तेव्हा घरातून हे नाव मित्रांमध्येही आलं. ‘भाऊ’ अशी मला प्रेमानं हाक मारली जाते. परंतु, अनेक कलाकारांचं टोपणनाव हे चारचौघात घेण्यासारखं मुळीच नाही. प्रेमानं जरी आपण त्या व्यक्तीला संबोधत असलो तरी ते ऐकताना चुकीचंच वाटतं; तशी नावं सार्वजनिक ठिकाणी घेऊ नये.’

 

 

इतर कलाकारांची टोपणनावं

मोहन जोशी – मोजो

चंद्रकांत कुलकर्णी – चंकू

उपेंद्र लिमये – उप्या

प्रार्थना बेहेरे – टुम्पा

मृण्मयी देशपांडे – मुन्ना

नम्रता संभेराव – नमा

सुयश टिळक – सुट्या

क्षितिज पटवर्धन – पट्या

पल्लवी पाटील – पपा

गौरव मोरे – गौऱ्या

संकलन : कल्पेशराज कुबल, स्वाती भट

Previous Post

करदात्यांसाठी महत्त्वाचे अपडेट, बजेटमध्ये नोकरदारांना दिलासा की भ्रमनिरास होणार ?

Next Post

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तोंडावर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तोंडावर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तोंडावर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group