Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी एकनाथ शिंदेंचं रोखठोक भाष्य, राहुल नार्वेकरांसोबतच्या भेटीचं कारणही सांगितलं

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 10, 2024
in political
0
आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी एकनाथ शिंदेंचं रोखठोक भाष्य, राहुल नार्वेकरांसोबतच्या भेटीचं कारणही सांगितलं
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 राहुल नार्वेकर दुपारी चार वाजता शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल देणार आहेत. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले.

 

 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मला रात्रीच्या अंधारात लपुनछपून भेटायला आले नव्हते. ते दिवसाच्या उजेडात त्यांच्या अधिकृत वाहनाने वर्षा बंगल्यावर आले होते. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासकामासंदर्भात चर्चा झाली, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल बुधवारी दुपारी दिला जाणार आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ठाकरे गटाच्या नेत्यांनी या भेटीवर टीका करत आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅचफिक्सिंग असल्याचे म्हटले होते. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले. ते बुधवारी दुपारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

विधानसभा अध्यक्ष दुपारी चार वाजता आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल देणार आहेत. त्यानंतरच मी आमची भूमिका मांडेन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांसोबतच्या भेटीचे समर्थन केले. काही लोक आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅचफिक्सिंग असल्याचा आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील आमदार हे विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये जेवत होते. तेव्हा आम्ही आक्षेप घेतला का? विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यांच्या अधिकृत वाहनातून मला भेटायला आले होते. ते रात्रीच्या अंधारात लपूनछपून नव्हे तर दिवसाउजेडी आले होते. त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासंदर्भात ही भेट होती. ही भेट झाली तेव्हा सरकारी अधिकारीही सोबत होते. आमच्यात लपूनछपून कोणतीही बैठक झाली नाही. आम्ही अंधारात बैठका घेणाऱ्यातील नाही. त्यामुळे या भेटीवरुन आरोप करणाऱ्यांच्या बोलण्यात तथ्य नाही. जेव्हा एखादा निकाल यांच्या बाजूने लागतो, तेव्हा ती संस्था चांगली ठरते. निकाल विरोधात गेल्यास संबंधित संस्थेवर टीका केली जाते, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

 

 

मेरिटच्याआधारे विधानसभा अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे: एकनाथ शिंदे

केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिलेली आहे. आम्हाला आयोगाने धनुष्यबाण हे चिन्हही दिले आहे. विधानसभेत आमच्याकडे ६७ टक्के तर लोकसभेत ७५ टक्के बहुमत आहे. या बहुमतच्या आधारेच निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. आम्ही अधिकृत पक्ष आहोत, धनुष्यबाण हे चिन्हही आमच्याकडे आहे. त्यामुळे विधानसभाध्यक्षांनी आमच्याच बाजूने निकाल दिला पाहिजे. आमचं सरकार हे घटनाबाह्य नाही तर ठाकरे गट हा घटनाबाह्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल त्यांनी बारकाईने वाचला पाहिजे. त्यावेळी माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने सरकार अस्तित्त्वात नव्हते. त्यामुळे राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा निर्णय योग्य होता. त्यावेळी आमच्याकडे ५० आमदार आणि भाजपचे ११० आमदार असे बहुमत होते. त्यामुळे अकलेचे तारे तोडणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचावा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.

 

 

ठाकरे गटाला त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. सरकार स्थापन झाल्यापासून ते पडणार असे वारंवार सांगितले जात आहे. मुख्यमंत्री बदलणार अशीही चर्चा होती. पण उलट सरकार आणखी मजबूत झाले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. विधानसभा अध्यक्ष आणि माझ्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. पण मुख्यमंत्री राहिलेला माणूस अशी भाषा करतो, हेच दुर्दैव आहे. मला आरोप बोलायला हे काही फौजदारी प्रकरण आहे का? हे नागरी प्रकरण आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Post Views: 62
Previous Post

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तोंडावर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

Next Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद...

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक ऐवजी झाडू..#viral #public

February 13, 2026

संजय पैठणकर यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला.’खूप शिका, पण आई-वडिलांना विसरू नका.

February 13, 2026

तीन महिने उलटून गेले तरीही या स्थळ संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही..#viral #solapurnews

February 13, 2026

1 हजार 32 कोटीच्या विकास कामांना मंजुरी.#viral #solapurnews

February 13, 2026

डीबी वुड या 45 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर शुक्रवारी (13 फेब्रुवारी) सकाळी अचानक भीषण आग.

February 13, 2026

इलेक्ट्रिक बसला लागली आग.50 कामगार सुखरूप.#public #marathinews #viral

February 13, 2026

लाडक्या बहिणींना मिळणार एकदम ६००० रुपये..#लाडकी_बहीण_योजना #ladkibahin

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान#public #trendingshorts

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679045

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697