Tuesday, February 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

साताऱ्यावरुन महायुतीत पेच, आता सर्वांचाच दावा,जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला, कोणत्याही परिस्थितीत जागा सोडणार…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 10, 2023
in maharashtra
0
साताऱ्यावरुन महायुतीत पेच, आता सर्वांचाच दावा,जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला, कोणत्याही परिस्थितीत जागा सोडणार…
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सातारा लोकसभा मतदारसंघांवरुन महायुतीत नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांवर शिवसेना, अजित पवार आणि भाजपनं दावा केला आहे.+

 

 

पाच राज्यांच्या विधानसभांच्या निकालानंतर लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील विविध पक्षांकडून लोकसभा मतदारसंघांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी कर्जत येथील अधिवेशनात सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा केल्यानंतर आता साताऱ्यातील लोकसभा मतदासंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरून चांगलच रणकंदन सुरू झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्यावतीनं पुरुषोत्तम जाधव यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. आता भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आक्रमक होत सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा आहे आणि आम्हीच या ठिकाणी लढणार असा दावा केल्यामुळं महायुतीमध्ये मतदारसंघावरून नवा पेच निर्माण झाला आहे.

 

भाजपानं गेल्या साडे तीन वर्षात या मतदासंघात मोठ्या ताकदीनं काम केल आहे. तसंच भाजप हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. यामुळं कोणी काहीही भूमिका मांडत असेल तरी हा मतदारसंघ कोणत्याही किमतीवर भाजपाकडंच राहिला पाहिजे‌, अशी भूमिका पक्ष श्रेष्ठींकडे मांडली आहे. आम्ही हा मतदारसंघ कोणत्याच परिस्थितीत सोडणार नसल्याचं सांगून जयकुमार गोरे यांनी थेट अजित पवारांना थेट आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे.

 

सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. २००९ ला पुरुषोत्तम जाधव हे उमेदवार होते. त्यानंतर २०१४ हा मतदारसंघ आरपीआयला सोडण्यात आला. २०१९ च्या लोकसभेला हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आला, निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिवसेनेत आलेल्या नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.मात्र, नरेंद्र पाटील २०१९ ला पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेपासून अंतर राखलं आहे.

 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर उदयनराजे भोसले निवडणूक जिंकले होते. मात्र, सहा महिन्यात राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांनी पोटनिवडणूक लढवली पण त्यांना अपयश आलं आणि श्रीनिवास पाटील विजयी झाले होते. आता हा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार हे स्पष्ट झालेलं नाही. पण, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे जाणार हे निश्चित आहे.

Post Views: 92
Previous Post

काल जर मी संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते : गोपीचंद पडळकर

Next Post

केंद्र सरकारच्या स्वछ वायू सर्वेक्षण योजने अंतर्गत सुमारे 2 कोटी 43 लाख रुपये निधी अंतर्गत रस्ता डांबरीकरण विकास कामांचे उद्घाटन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
केंद्र सरकारच्या स्वछ वायू सर्वेक्षण योजने अंतर्गत सुमारे 2 कोटी 43 लाख रुपये निधी अंतर्गत रस्ता डांबरीकरण विकास कामांचे उद्घाटन

केंद्र सरकारच्या स्वछ वायू सर्वेक्षण योजने अंतर्गत सुमारे 2 कोटी 43 लाख रुपये निधी अंतर्गत रस्ता डांबरीकरण विकास कामांचे उद्घाटन

ताज्या बातम्या

२३ वर्षीय तरुणाने प्रेम संबंधातून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून केली आत्महत्या.#public

February 17, 2026

महाशिवरात्री निमित्त श्री विठ्ठलाची पूजा संपन्न

February 17, 2026

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ट्रेनिंग प्रोग्रॅम 

February 17, 2026

द .ह. कवठेकर प्रशालेत मुलींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडर व डिसपोझल मशीनचे वितरण

February 17, 2026

एनईपी २०२०’ अनुषंगाने बी. कॉम. अभ्यासक्रमात नवे पर्व : प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

February 17, 2026

पंचाक्षरी लोणार नगराध्यक्ष श्री चां उपविजेता 

February 17, 2026

कर्मयोगी इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक अनिल बाबर  यांना पीएचडी पदवी प्रदान

February 17, 2026

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

February 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0683982

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697