मुदखेड ता.प्र.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे. त्यातच सर्वच पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणूक संदर्भात जयत तयारी चालू असून भोकर विधानसभा निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजि.कु. दामिनीताई दादाराव पाटील ढगे हे देखील काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसत आहे
याच अनुषंगाने इंजि. कु. दामिनीताई दादाराव पाटील ढगे भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये आपला जनसंपर्क वाढवला असून त्याच अनुषंगाने दिनांक १२ जुलै २०२४ रोजी मुदखेड शहरातील ओमकार गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून या पत्रकार परिषदेमध्ये दादाराव पाटील ढगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आगामी विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे मागणी केली असून काँग्रेस पक्षाने जर माझ्या मुलीला भोकर विधानसभेतून उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
भोकर विधानसभेतील मतदारांनी स्थानिकचा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून दिला तर
भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असो अर्धापूर येथील केळी बागायत असो व मुदखेड येथील फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असे सामाजीक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.