भोकर(प्रतिनिधी)इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या संख्येत दरवर्षी वाढ होत होत असून सदरील शाळेत विद्यार्थ्याची अँडमीशन फी पाठोपाठ पुस्तकाच्या माध्यमातून अर्थिक लूट होत असल्याच्या प्रतिक्रिया पालक वर्गातून उमटत आहेत याकडे शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
भोकर शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालकांकडून मागील काही दिवसापासून मनमानी कारभार सूरू आहे आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक वर्गाचा कल इंग्रजी माध्यमाकडे दिसत असून याचा फायदा संबधित शाळा चालक उचलत असल्याचे निर्देशनास येत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फिस आकारली जात असून या संदर्भात शासकीय नियमावलीचे पालन होत नसुन पालकांना याबाबत कोणतीही पावती दिली जात नाही.
पाल्याच्या उज्वल भविष्यांसाठी पालक वर्ग निमुटपणे हे सर्व सहन करत असुन मुलांच्या शिक्षणाकरीता याबाबत पालकांनी तक्रार करित नाहीत यामूळे संस्थाचालकांची मनमानी सूरु असल्याचे दिसते प्रवेश शुल्का पाठोपाठ आता पुस्तके, ड्रेस, शुज सर्व साहित्य शाळेतुनच खरेदी करणे बंधनकारक असल्याचे कळते.एकूणच इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तक्रारी पालकांकडून ऐकावयास मिळत असून शिक्षण विभागाने याकडे लक्ष देवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालकवर्गात होत आहे.