विविध मागण्यासाठी सोनखेड येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन
सोनखेड – (तभा वृत्तसेवा)
तालुक्यातील सोनखेड येथे शेतकरी नेते लक्ष्मण मोरे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन आज दि.8/09/सप्टेंबर रोजी करण्यात आला .
या आंदोलनाला परीसरातील हजारो शेतकरी बंधू उपस्थित होते
गेली बरीच दिवसापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारे नांदेड जिल्ह्यातील युवा शेतकरी नेतृत्व लक्ष्मण मोरे यांनी रविकांत तुपकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देत दि.८ सप्टेंबर रोजी सकाळी 10.30.वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे.आंदोलनातील प्रमुख मागण्या
सोयाबीन 9000 हजार रुपये भाव द्या,
कापसाला 12000 रूपये भाव देवून संपूर्ण कर्ज मुक्ती करत सातबारा कोरा करा.ऑनलाईन न करता सरसगट 100%पिक विमा देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी बोलत असताना लक्ष्मण मोरे व शेतकरी बांधवांनी सरकारला विषारा दिला आहे शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने मान्य नाही केल्यास जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा घेऊन येऊ असा इशारा दिला आहे
या आंदोलनाला मा.सरपंच अच्युत मोरे,बाळासाहेब जाधव,अंगद पाटील,बालाजी दिघे,सत्यवान किरवले,ऋषी वानखेडे,,नितीन पाटील कोकाटे, लक्ष्मण चव्हाण,शंकर मोरे,माणिक मोरे, द्यानोबा मोरे गजानन मोरे,शिवाजी किरकान,अविनाश मोरे,अक्षय मोरे,निवास मोरे,ओम वरळे, बाबुराव कोल्हे पवन घटोळ, विजय देशमुख,या सह परिसरातील हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते..
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...